‘या’ योजनेतून मिळवा 300 युनिट मोफत वीज आणि मिटवा विज बिलाची कटकट! करा अशा पद्धतीने अर्ज व मिळवा अनुदान

Published on -

सौर ऊर्जा वापरायला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाने अनेक प्रकारच्या योजना सुरू केल्या आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य सरकारच्या देखील योजना असून या माध्यमातून शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पॅनल किंवा सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यासाठी अनुदान दिले जाते.

तसेच शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून देखील पंतप्रधान कुसुम योजनेसारखी योजना खूप महत्त्वाची असून या माध्यमातून सौर उर्जेवर आधारित इलेक्ट्रिक पंप बसवण्याकरिता अनुदान दिले जाते. यासोबतच सौर रूप-टॉप सोलर योजनेच्या अंतर्गत घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान दिले जाते.

अशा बऱ्याच योजना आपल्याला सांगता येतील. यात नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केलेली व 29 फेब्रुवारी रोजी मंजुरी देण्यात आलेली पीएम सूर्य घर योजना देखिल तितकीच महत्त्वाची असून या योजनेच्या माध्यमातून देखील 2 kW सोलर पॅनल सिस्टम करिता एकूण खर्चाच्या 60 टक्के सबसिडी आणि 2 ते 3 kW पर्यंत क्षमतेच्या सोलर सिस्टम करिता एकूण खर्चाच्या 40% सबसिडी देण्यात येते.

पीएम सुर्यघर योजनेच्या माध्यमातून एक किलो वॅट क्षमतेच्या सोलर सिस्टम बसवण्याऱ्या प्रत्येकासाठी कमीत कमी तीस हजार रुपये अनुदान मिळणार आहे. तर दोन किलो वॅट यंत्रणा बसवणाऱ्यांकरिता नवीन योजनेअंतर्गत साठ हजार रुपये अनुदान मिळणार आहे.

 पीएम सुर्यघर योजनेसाठी कसा कराल अर्ज?

1- याकरिता सगळ्यात अगोदर तुम्हाला www.pmsuryagarh.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. यामध्ये राज्य आणि वीज वितरण कंपनी यांची निवड करून तुम्हाला पुढची प्रक्रिया करावी लागणार आहे. यामध्ये वीज ग्राहक क्रमांक तसेच मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी देखील तुम्हाला नमूद करावे लागेल.

2- या ठिकाणी एकदा नोंदणी केल्यानंतर ग्राहक क्रमांक आणि मोबाईल क्रमांकासह लॉगिन तुम्ही करू शकतात. या पोर्टलवर आवश्यक फॉर्म भरून तुम्ही रूप-टॉप सोलरसाठी अर्ज करू शकतात.

ही प्रक्रिया झाल्यानंतर ग्राहकाला स्थानिक डिस्कॉमच्या मंजुरीची प्रतीक्षा करावी लागेल. एकदा ही मंजुरी मिळाल्यावर वीज वितरण कंपनी अर्थात डिस्कॉममधील कोणत्याही रजिस्टर विक्रेत्याकडून सोलर प्लांट इन्स्टॉल करावा लागेल.

 कसा मिळवाल अनुदानाचा लाभ?

त्यासाठी जे काही विक्रेत्यांची यादी आहे ती पोर्टलवर देण्यात आलेली आहे. पोर्टलच्या साह्याने तुम्ही योग्य सौर प्रणाली तसेच तिचे फायदे, विक्रेता रेटिंग इत्यादी महत्त्वाची माहिती त्या ठिकाणी तुम्हाला देण्यात आली असून त्यामुळे तुम्हाला फायदा होतो. सोलर सिस्टम स्थापन केल्यानंतर किंवा बसवल्यानंतर ग्राहकाला प्लांटचा तपशील सादर करावा लागेल

व नेट मीटर करता अर्ज करावा लागेल. नेट मीटर बसवल्यानंतर आणि डिस्कॉम द्वारे तपासणी झाल्यानंतर पोर्टलवर एक कमिशनिंग प्रमाणपत्र तयार केले जाईल. कमिशनिंग प्रमाणपत्र किंवा रिपोर्ट मिळाल्यावर ग्राहकाला पोर्टल द्वारे बँक खात्याचा तपशील आणि रद्द केलेला चेक सादर करावा लागेल आणि ग्राहकाला त्यानंतर 30 दिवसांच्या आत त्याच्या बँक खात्यात अनुदान मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe