चिंताजनक! मुंबई-पुण्यात 4.85 लाख लोक होम क्वारंटाइन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :-  महाराष्ट्रात कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढतच चालले आहे. प्रशासनाने विविध उपाययोजना योजूनही रुग्ण वाढतच आहे. मुंबई, उपनगरं आणि पुण्यात तर हे प्रमाण वाढते आहे.

धक्कादायक म्हणजे काल दिवसभरात तब्बल २ हजार 608 रुग्ण नव्याने वाढले आहेत. मुंबई-पुण्यात 4 लाख 85 हजार 323 लोक होम क्वारंटाइन करण्यात आली आहेत.

तर महाराष्ट्रात एकूण रुग्णसंख्या 47190 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 60 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू नोंदला गेला आहे. यातले 40 मुंबईतले तर 14 पुण्यातले रुग्ण आहेत.

राज्यभरात कोरोनाबळींच्या संख्येने कालच दीड हजाराचा टप्पा ओलांडला होता. आतापर्यंत 1577 जणांचा या कोरोनाच्या साथीत बळी गेला आहे.

ही देशातली सर्वात मोठी संख्या आहे. राज्यभरात घरी विलगीकरणात असलेले 4 लाख 85 हजार 323 जण आहेत तर ३३ हजार 545 लोकांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment