Success Story:- कुठलाही क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही काम करतात. तेव्हा त्या क्षेत्राशी संबंधित असलेल्या विषयाशी संबंधित जर माहिती घेत राहिलात व त्यानुसार जर व्यवसाय मध्ये किंवा तुमच्या कामांमध्ये तुम्ही बदल केला तर नक्कीच दर्जेदार पद्धतीचे काम होते व त्यामुळे व्यवसाय उभारणीला किंवा व्यवसाय मोठा करण्याला मोठा हातभार लागत असतो.
प्रयोगशीलता हा गुण व्यक्तीमध्ये असणे खूप गरजेचे असते. कारण या गुणामुळेच अनेक वेगवेगळे शोध लागत असतात किंवा काही नवीन गोष्टी निर्माण होत असतात. कृषी क्षेत्रामध्ये देखील असे अनेक शेतकरी आपण पाहतो की ते शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करत असतात.

मग ते प्रयोग विविध पिकांच्या वानांच्या शोधाच्या संदर्भात असतील किंवा शेतीसाठी उपयुक्त जुगाड यंत्र बनवण्यासाठी असतात व या मधून नवनिर्मिती होत असते. अगदी याच पद्धतीने जर आपण बिहार राज्यातील मुजफ्फरपुर येथील इंजिनिअर असलेले मोहम्मद नाज या तरुणाची यशोगाथा पाहिली तर याने चक्क मक्याच्या वाया जाणाऱ्या सालीपासून विविध प्रकारचे उत्पादने बनवले आहेत व इतकेच नाही तर त्या उत्पादनांचे पेटंट देखील मिळवले आहे.
मागच्या महिन्यामध्ये भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून या मक्याच्या वेस्ट सालींपासून विविध प्रकारच्या उपयुक्त प्लेट तसेच वाट्या, पिशव्या आणि इतर उत्पादन बनवण्याचे प्रमाणपत्र त्यांना मिळालेले आहे.
या उच्चशिक्षित तरुणाने मक्याच्या सालीपासून बनवली विविध उत्पादने
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बिहार राज्यातील मुजफ्फरपुर येथील रहिवासी असलेले मोहम्मद नाज यांनी मक्याच्या वाया जाणाऱ्या सालींपासून विविध प्रकारची उत्पादने बनवले आहेत व त्या बाबत त्यांना भारत सरकारकडून पेटंट देखील मिळालेले आहे.
बिहार राज्यामध्ये भात आणि गहू पिकांनंतर मका हे पीक सर्वात जास्त घेतले जाते. भारतात मक्याला चांगली मागणी आहे. परंतु आता मक्याच्या सालीपासून बनवलेल्या उत्पादनांची मागणी देखील वाढेल अशी शक्यता आहे.
या शक्यतेला धरून मोहम्मद नाज यांनी एमटेकचे शिक्षण घेतल्यानंतर हैदराबाद येथील इंजीनियरिंग कॉलेजमध्ये असलेली चांगल्या पगाराची नोकरी सोडली व ते गेल्या आठ वर्षापासून त्यांच्या गावी राहत आहेत. नोकरी सोडल्यानंतर काहीतरी वेगळे करावे ही इच्छा त्यांच्या मनात होती
व त्या इच्छेतूनच मक्याच्या सालीपासून काहीतरी उत्पादने बनवण्याचा निर्णय त्यांनी घेतला व 21 फेब्रुवारी 2024 रोजी याबाबत त्यांनी भारत सरकारचे पेटंट कार्यालयाकडून याबाबत प्रमाणपत्र देखील मिळवले.
अशाप्रकारे उत्पादने बनवायला केली सुरुवात
जेव्हा त्यांनी नोकरी सोडली व गावी येऊन काहीतरी वेगळ्या करण्याच्या इच्छेने मक्याच्या सालीपासून काहीतरी वेगळे उत्पादन बनवण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना गावकरी आणि कुटुंबीयांनी वेड्यांच्या गणतीत काढले.
गावकरी त्यांना म्हणायचे की चांगले पगाराची नोकरी सोडली व या मक्याच्या कचऱ्याच्या नादी का लागला? परंतु मोहम्मद नाझ यांनी लोकांच्या या म्हणण्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केले व प्रचंड प्रमाणात इच्छाशक्ती असल्यामुळे त्या जोरावर संपूर्णपणे कामावर लक्ष केंद्रित करून मक्याच्या वाया जाणाऱ्या सालीपासून पिशवी बनवली.
त्यानंतर मात्र विविध प्रकारच्या प्लेट तसेच वाट्या व इतर उत्पादने देखील बनवली. त्यानंतर मार्च 2019 मध्ये त्यांनी या उत्पादनांच्या पेटंट करिता अर्ज केला व या वर्षी फेब्रुवारी मध्ये वीस वर्षासाठीचे त्यांना या उत्पादनांचे पेटंट मिळाले आहे.
मोहम्मद नाज यांचा आहे प्लास्टिकला पर्याय देण्याचा प्रयत्न
याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, मक्याच्या सालीपासून आतापर्यंत प्लेट्स तसेच चहाचे कप व दहा प्रकारच्या वेगवेगळ्या वस्तू बनवलेल्या आहेत. परंतु येणाऱ्या दहा वर्षात मक्याच्या सालीपासून चॉकलेट देखील बनवण्याचा त्यांचा मानस आहे.
एवढेच नाही तर बिस्किटे तसेच साबण व कॉर्न पिल रॅपर्स इत्यादी वस्तू देखील बनवल्या जातील असे देखील त्यांनी म्हटले. येणाऱ्या कालावधीमध्ये मक्याच्या या सालीपासून अनेक उत्पादने बनवून प्लास्टिकला पर्याय देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.