Elon Musk: एलोन मस्क घेऊन येत आहेत नवीन धमाकेदार व्हिडिओ ॲप! नेटफ्लिक्स आणि युट्युबला देईल टक्कर

Ajay Patil
Published:
elon musk

Elon Musk:- जगप्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क हे नेहमी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करत असतात व हीच त्यांची पूर्ण जगात ओळख आहे. एक यशस्वी उद्योजक तसेच गुंतवणूकदार आणि व्यावसायिक मॅग्नेट असून SpaceX चे संस्थापक आणि सीईओ तसेच मुख्य अभियंता देखील आहेत.

त्यांची ही कंपनी एरोस्पेस आणि अंतराळ वाहतूक सेवा कंपनी म्हणून ओळखली जाते. एवढेच नाही तर 2004 मध्ये त्यांनी इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी टेस्ला मोटर्स INC चे अध्यक्ष आणि उत्पादक आर्किटेक म्हणून देखील ते सामील झाले व 2008 मध्ये ते सीईओ बनले.

म्हणजे एकंदरीत पाहता तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये इलॉन मस्क यांची मोठी कामगिरी आहे. अगदी याच पद्धतीने त्यांनी आता नेटफ्लिक्स आणि प्राईम व्हिडिओ सारखे युट्युब आणि ओटीपी ॲप्सला टक्कर देऊ शकेल असे व्हिडिओ ॲप घेऊन येत

असून त्यांच्या X या प्लॅटफॉर्मवरून ही सेवा वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सेवेच्या माध्यमातून स्मार्ट टीव्हीवर व्हिडिओ पाहता येणार आहेत. नुकतीच या संबंधीची घोषणा इलॉन मस्क यांनी केली.

 काय आहे इलॉन मस्क यांचा प्लॅन?

यासंबंधी ते एक मोठा प्लान बनवत असून त्या प्लॅन अंतर्गत सुपर अँप सुविधा सुरू केली जाणार असून या माध्यमातून एकाच ॲपमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

यामध्ये ऑक्टोबर मध्ये Xpress च्या माध्यमातून युजर्स करिता व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलिंग सुविधा देण्याची घोषणा करण्यात आली होती व त्यासोबतच ऑनलाइन पेमेंट सेवा देण्याची घोषणा देखील केली होती.

X चे वापरकर्ते टीव्हीवर पाहू शकतील व्हिडिओ

इलोन मस्क यांच्या घोषणेनुसार आता X वरचे लांब लचक व्हिडिओ स्मार्ट टीव्हीवर लवकरच उपलब्ध होणार असून अशा पद्धतीचे व्हिडिओ लवकरच सोशल नेटवर्क X वरून स्मार्ट टीव्हीवर पाहता येणार आहेत. याबाबत जर आपण फॉर्च्यूनचा रिपोर्ट पाहिला

तर त्यांच्यानुसार इलॉन मस्कचे हे नवीन ॲप google च्या यूट्यूब टीव्ही एप्लीकेशन सारखे असणार असून व्हिडिओ सेक्टर मध्ये व्हिडिओ स्ट्रीमिंग मध्ये आघाडीवर आहे. याच अँपला टक्कर किंवा स्पर्धा देण्याकरिता  इलोन मस्क यांच्या माध्यमातून ही व्हिडिओ सेवा सुरू करण्यात येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe