पिसाळलेला कुत्रा चावल्याने एकाचा मृत्यू !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- शेवगाव तालुक्यातील कांबी येथील बंडु शंकर बोरकर (वय ५५) या ऊसतोडणी करणाऱ्या इसमास दि.२६ एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी पिसाळलेले कुत्रे चावल्याने उपचार करूनही काल (दि.२३) शनिवार रोजी नगर येथील जिल्हा रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला आहे.

आर्थिक परिस्थिती गरिबीची असलेले बंडु बोरकर हे ऊसतोडणी कामगार होते. नुकताच संपलेला ऊसतोडणी हंगाम त्यांनी बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना येथे पूर्ण करुन २५ एप्रिल रोजी आपल्या पत्नी व मुलासह ते कांबी गावामध्ये परतले होते.

दि.२६ एप्रिल रोजी ते आपल्या मोठ्या मुलाने गावातीलच शेतजमीन बटाईनेेकेलेल्या शेतामध्ये गेले असता, ऐन दुपारी १२ चे दरम्यान त्यांना पिसाळलेल्या कुत्र्याने येऊन चावा घेतला होता.

चावा एवढा भयंकर घेतला होता की, शरीराच्या अनेक ठिकाणी त्या कुत्र्याचे दात घुसले होते. घटना घडताच त्यांना बोधेगाव येथील खाजगी दवाखान्यात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये नेण्याचा सल्ला दिला

. त्यानुसार नगर येथे नेल्यावर त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार करुन घरी पाठवले होते. त्यांना १५ टाके पडले असल्याने पुढील मलमपट्टी आपल्या शेजारी असणाऱ्या सरकारी दवाखान्यात करावी. असेही सांगितले होते.

दरम्यान चावा घेतलेल्या पिसाळलेल्या कुत्र्याने गावातील अजुन एका इसमास व गाईला चावा घेतला होता. त्यामध्ये गाईचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच बोरकर धास्तावले त्यांनी आपला आहार कमी केला असल्याने व प्रकृतीमध्ये अस्वस्थपणा वाटल्याने त्यांना पुन्हा नगरला सिव्हीलमध्ये दाखल केले असता, त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment