FASTag: फास्टटॅग घ्यायचा तर ‘या’ ठिकाणाहूनच करा खरेदी नाहीतर वाया जातील पैसे! NHAI ने जारी केली अधिकृत फास्टटॅग जारीकर्त्याची यादी

Published on -

FASTag:- फास्टटॅगचा वापर हा रस्त्यांवर जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा टोल भरण्यासाठी केला जातो हे आपल्याला माहिती आहे. यामध्ये बऱ्याच जणांचे फास्टटॅग खाते हे पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये होते व नुकतेच काही दिवसांपूर्वी या पेमेंट बँकने नियमांचे पालन न केल्यामुळे रिझर्व बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट बँक वर बंधने घातले आहेत.

त्यानंतर पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडला फास्टटॅग जारी करणाऱ्या ज्या काही बँका आणि एनबीएफसी आहेत त्यांच्या यादीतून काढून टाकण्यात आलेले आहे. त्यामुळे आता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात एनएचएआयने नवीन फास्टटॅग जारीकर्त्याची एक नवीन यादी जारी केली आहे.

त्यामुळे आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेड या यादीतून काढून टाकल्यानंतर मात्र वाहन मालकांना इतर कोणत्याही अधिकृतपणे जारी करण्यात आलेल्या  बँकेकडून फास्टटॅग खरेदी करावा लागणार आहे.

 भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जारी केली सुधारित फास्टटॅग जारीकर्त्यांची यादी

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने आता अधिकृत फास्टटॅग जारीकर्त्यांची सुधारित यादी जारी करण्यात आली असून यानुसार आता त्यामध्ये एअरटेल पेमेंट बँक, अलाहाबाद बँक, एयु स्मॉल फायनान्स बँक, ॲक्सिस बँक लिमिटेड, बंधन बँक, बँक ऑफ बडोदा,

बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, सिटी युनियन बँक लिमिटेड, कॉसमॉस बँक, डोंबिवली नागरी सहकारी बँक, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक, फेडरल बँक, फिनो पेमेंट बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, आयडीबीआय बँक,

आयडीएफसी फर्स्ट बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज  बँक, इंडसइंड बँक, जम्मू आणि काश्मीर बँक, कर्नाटक बँक, करून व्यास बँक, कोटक महिंद्रा बँक, लिव्हक्विक टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर सहकारी बँक लिमिटेड, पंजाब महाराष्ट्र बँक, पंजाब नॅशनल बँक,

सारस्वत बँक, दक्षिण भारतीय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक, जळगाव पीपल्स को-ऑप बँक, त्रिशूर जिल्हा सहकारी बँक, युको बँक, येस बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांचा आता यामध्ये समावेश करण्यात आला असून या वरील बँकांनी एनबीएफसी कडून फास्टटॅग खरेदी करता येणार आहे.

 पेटीएम फास्टटॅग धारकांनी काय करावे?

ज्या वाहनधारकांनी पेटीएम पेमेंट बँक लिमिटेड कडून फास्टटॅग खरेदी केले होते त्यांनी आता एनएचएआय कडून जारी करण्यात आलेल्या कुठल्याही बँकेकडून फास्टटॅग खरेदी करावा. याबाबत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि

रिझर्व बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की, 15 मार्च 2024 नंतर पेटीएम फास्टटॅग खात्यांमध्ये कुठल्याही प्रकारच्या टॉप-अप ला परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे आता पेटीएम फास्टटॅग वापरकर्त्यांनी जारी केलेल्या कोणत्याही अधिकृत बँकेकडून नवीन फास्टटॅग खरेदी करावा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe