Palak Cultivation: पालकच्या ‘या’ वाणाची एकदा लागवड करा आणि 6 ते 7 वेळा करा काढणी! उन्हाळ्यात कमी कालावधीत मिळेल चांगला पैसा

Ajay Patil
Published:
spinch cultivation

Palak Cultivation:- भाजीपाला लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर केली जाते. यामध्ये प्रामुख्याने मिरची,टोमॅटो, कोबी, बटाटे, भेंडी, वांगी इत्यादी भाजपाला लागवड मोठ्या प्रमाणावर होत असते. भाजीपाला पिकांचे वैशिष्ट्य म्हणजे कमीत कमी कालावधीत जास्त खर्च न करता हातात चांगले उत्पन्न मिळणे या माध्यमातून शक्य होते.

तसेच भाजीपाला पिकांसाठी आता वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्यामुळे अगदी कमी जागेत भरघोस उत्पादन मिळणे शक्य झाल्यामुळे लाखोत नफा शेतकरी मिळवत आहेत. भाजीपाला पिकांमध्ये पालेभाज्या देखील शेतकऱ्यांमध्ये खूप प्रसिद्ध असून कोथिंबीर, मेथी आणि पालक या भाज्यांची लागवड केली जाते

व अगदी कमीत कमी खर्च आणि कमीत कमी वेळेत या माध्यमातून देखील लाखो रुपयांचे उत्पन्न शेतकऱ्यांना बऱ्याचदा मिळून जाते. या दृष्टिकोनातून उन्हाळी हंगामामध्ये थोड्या प्रमाणात पाण्याची सोय असेल तर पालकची लागवड करून शेतकरी चांगला पैसा उन्हाळ्याच्या कालावधीत मिळवू शकतात.

बऱ्याच भाजीपाला पिकांना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चांगला दर मिळतो. या अनुषंगाने या कालावधीत पालकची लागवड शेतकऱ्यांना फायद्याचे ठरू शकते. म्हणून आपण या लेखांमध्ये पालकाच्या ऑल ग्रीननावाच्या एका वाणाची माहिती घेणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला कमी कालावधीमध्ये उन्हाळ्यात चांगला दर मिळून आर्थिक फायदा होऊ शकतो.

 ऑल ग्रीन पालक वाणाचे बियाणे मिळते घरपोच

ऑल ग्रीन हे पालक वाणाचे बियाणे भारतीय बियाणे महामंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना घरपोच उपलब्ध करून दिले जात असून या बियाण्याच्या एका पाचशे ग्रॅम पाउचची किंमत 65 रुपये इतकी आहे. शेतकरी राष्ट्रीय बियाणे महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन या बियाण्याची ऑर्डर करू शकतात.

 काय आहेतऑल ग्रीनवाणाची वैशिष्ट्ये?

पालक भाजीचे हे वाण अधिक उत्पादन देण्याकरिता खूप प्रसिद्ध असून या वाणाची रोपे ही एकसारखी वाढतात व हिरवीगार असतात. तसेच ही प्रजाती केवळ 35 ते 40 दिवसांमध्ये काढणीला येते. एकदा काढणी सुरू झाली की 20 ते 30 दिवसांच्या अंतराने तुम्ही ऑल ग्रीन या पालक भाजीच्या वाणाची कापणी करू शकतात.

म्हणजेच एकदा तुम्ही लागवड केली तर तुम्हाला सहा ते सात वेळा या भाजीची काढणी करता येणे शक्य आहे. जर तुम्ही व्यवस्थित व्यवस्थापन ठेवले आणि आधुनिक पद्धत वापरली तर तुम्ही भरघोस उत्पादन या माध्यमातून मिळवून उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये जास्तीचे उत्पादन मिळवू शकतात.

 आरोग्याच्या दृष्टिकोनातून पालकचे महत्व असल्याने बाजारात कायम असते मागणी

आरोग्याच्या दृष्टिकोनातून पालक खूप महत्त्वाचे असून यामध्ये लोहाचे प्रमाण असते. आरोग्यदायी गुणांमुळे बाजारपेठेत देखील मोठी मागणी असल्याने दर देखील चांगला मिळतो. तसेच उन्हाच्या दिवसांमध्ये जर लागवड केली तर

या दिवसांमध्ये भाजीपाल्याला असलेल्या जास्तीच्या दरांमुळे जास्तीचा फायदा मिळू शकतो. तसेच सध्या उन्हाळ्याचे दिवसांमध्ये लग्नाचा कालावधी असतो यामुळे या दिवसात पालकला खूप चांगली मागणी असते. त्यामुळे तुम्ही ऑल ग्रीन या वाणाची उन्हाळ्यामध्ये लागवड करून बंपर कमाई करू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe