अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद यांच्यावतीने जामखेड शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोफत पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले.
यावेळी संजय काशिद म्हाणाले की ,जामखेड शहरातील नागरिकांना गेल्या दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्यासाठी तीव्र टंचाई निर्माण झाली होती.
नगरपरिषदेकडून शहरात तब्बल दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे.त्यामुळे जामखेड शहरातील नागरिकांचे पाण्यासाठी होत असलेले हाल पाहावत नव्हते.
त्यामुळे शिवसेनेच्या ध्येयधोरणानुसार आणि राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून व अहमदनगर दक्षिण जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्यात आले. असे त्यांनी सांगितले.
यावेळी जामखेड शहर प्रमुख गणेश काळे, शहर उपप्रमुख अवि बेलेकर,सागर गुंदेचा, नाना रासकर, दिलीप आजबे, राजाभाऊ म्हेत्रे,कैलास खेत्रे, शिवा जावळे ,उद्धव पवार, भाऊ पोटफोडे, नितीन खेत्रे, युवासेना अतुल पवार, विशाल जगताप, गणेश चिंचकर, आकाश मुळे, विशाल निमोणकर हे पाणी वाटप करण्यासाठी परीश्रम घेत आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com