अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- कोरोना बाधीत आढळल्याने पाथर्डीकरांची चिंता पुन्हा वाढली आहे. महसूल, पोलिस व आरोग्य प्रशासनाने चिंचपूर पांगुळ हे गाव सील केले असून, दि.१जून २०२० पर्यंत गावाच्या सीमाबंद करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग झालेल्या महिलेच्या आई,वडीलांना पाथर्डी येथे संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे.
पाथर्डी तालुक्यात कोरोना रुग्ण सापडल्याने आता मुंबई व पुणे येथुन आलेल्या नागरीकांबाबतीत दक्ष राहण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनाबाधीत महिलेचे माहेर चिंचपूर पांगुळ आहे. तिचा शिरुर तालुक्यात एका खेडेगावातील पोलिस युवकाशी विवाह झालेला आहे. ती मुंबई येथुन दि.१९ मे २०२० रोजी रात्री गावात आई,वडीलांकडे बाळंतपणासाठी आलेली आहे.
तिला तिचा पती व पतीचा चुलतभाऊ यांनी मुंबई येथुन चिंचपूरला आणुन सोडले आहे. गरोदर महीलेची राहण्याच्या व्यवस्था एका स्वतंत्र खोलीत केलेली होती. दि.२१ मे रोजी तिला त्रास जाणवु लागल्याने तिला पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले व तेथुन लगेच नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
तेथे तपासणीनंतर दि.२२ मे २०२० रोजी तिचा अहवाल पॉझीटिव्ह आला आहे. तालुक्यात आता कोरोना पॉझीटिव्ह रुग्णांची संख्या दोन झाली आहे. पहिला रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. पिंपळगाव टप्पा येथील एक संशयीत पुरुष रुग्ण नगरच्या जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी रात्री पाठविण्यात आला आहे.
तो दि.१७ मे २०२० रोजी मुंबई येथुन आलेला आहे. त्याला गावातच होमकोरोनटांईन करण्यात आलेले होते. ताप व घशाचा त्रास झाल्याने त्याला नगरला तपासणीसाठी पाठविले आहे. त्याचा अहवाल शनिवारी सायंकाळी येणार आहे. नागरीकांमधे भितीचे वातावरण पसरले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com