Kidney Health Tips: आहारामध्ये करा ‘या’ 5 सुपरफूडचा समावेश आणि निरोगी ठेवा किडनी! वाचा काय दिली तज्ञांनी माहिती?

Ajay Patil
Published:
health of kidney

Kidney Health Tips:- शरीरातील प्रत्येक अवयव हे शरीर प्रक्रियेसाठी खूप महत्त्वाचे असून प्रत्येक अवयवाचे काम जर व्यवस्थितपणे चालत असेल तर शरीर निरोगी राहते व शरीरक्रिया देखील व्यवस्थितपणे पार पाडता येतात. त्यामुळे प्रत्येक अवयवाच्या आरोग्यावर लक्ष ठेवणे किंवा लक्ष देणे खूप गरजेचे असते.

एकंदरीत संपूर्ण शरीराच्या आरोग्याचा विचार केला तर त्यावर आपण घेत असलेल्या आहाराचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडत असतो. त्यामुळे संतुलित आहार घेणे खूप गरजेचे आहे.संतुलित आहाराच्या माध्यमातून शरीराला आवश्यक असलेल्या घटकांचा पुरवठा योग्य झाल्याने शरीर निरोगी राहते व व्यक्तीला आरोग्य लाभते.

अगदी याच पद्धतीने जर आपण शरीरातील किडनीचा विचार केला तर शरीरातील फिल्टर म्हणून किडनीला ओळखले जाते व हा एक खूप महत्त्वाचा अवयव आहे. रक्तातील टाकाऊ पदार्थ फिल्टर करणे तसेच इलेक्ट्रोलाइट्स संतुलित करणे तसेच चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले हार्मोन्स तयार करणे इत्यादी महत्त्वाची कामे किडनीच्या माध्यमातून पार पाडले जातात.

यामुळे किडनीचे आरोग्य उत्तम राखणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे आहारामध्ये काही महत्वाचे फूड तुम्ही घेतले तर नक्कीच किडनीचे आरोग्य चांगले राहते व तिची काम करण्याची क्षमता देखील वाढू शकते. याबद्दल तज्ञांनी काही महत्त्वाची माहिती दिलेली आहे ती या लेखात आपण बघू.

 किडनीच्या उत्तम आरोग्यासाठी ही सुपरफूड ठरतील फायद्याची

1- रावस मासा रावस माशांमध्ये ओमेगा तीन फॅटी ऍसिड मोठ्या प्रमाणावर असून या माशात असलेल्या दाहक विरोधी गुणामुळे हृदय आणि रक्तवाहिन्या यांच्या उत्तम आरोग्याकरिता फायद्याचा ठरतो.

या माशाच्या सेवनाने कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत होते व त्यामुळे किडनीच्या आजारांचा धोका देखील कमी होतो. तसेच या माशांमध्ये प्रथिने देखील उत्तम असल्यामुळे स्नायूंच्या कार्यासाठी आवश्यक अमिनो ऍसिड या माशाच्या माध्यमातून मिळते.

2- केल केल हे साधारणपणे पालकासारखे दिसते. हे प्रामुख्याने सॅलड किंवा सँडविच आणि सबरोलमध्ये प्रामुख्याने वापरले जाते. यात मोठ्या प्रमाणावर विटामिन्स तसेच मिनरल्स व अँटिऑक्सिडंट  असते. त्यामुळे रक्त गोठणे किंवा हाडे ठिसूळ होणे यासारख्या समस्यांवर गुणकारी आहे.

तसेच यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण कमी असल्यामुळे किडनीच्या आजार असलेल्या रुग्णांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. जर तुम्ही डेली च्या आहारामध्ये जर केलचा समावेश केला तर किडनीच्या कार्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मदत होते.

3- लसुन लसणामध्ये एलिसीन असते. यामुळे बॅक्टेरियांच्या वाढ होण्यास प्रतिबंध बसतो व जळजळीचे प्रमाण कमी होते.

तसेच लसूण जर नियमित सेवन केला तर रक्तदाबाची समस्या कमी होते व कोलेस्टेरॉल नियंत्रणामध्ये राहते. यामुळे हृदयविकार आणि मूत्रपिंडाच्या विविध विकारांपासून संरक्षण होते.

4- क्विनोवा यामध्ये आवश्यक पोषक तत्व तसेच त्यासोबत फायबर, लोह, प्रोटीन आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणावर असते. क्विनोआमध्ये पोटॅशियम आणि फॉस्फरसचे प्रमाण कमी असते. त्यामुळे किडनीच्या समस्या ज्या व्यक्तींना आहेत त्यांच्यासाठी हे फायद्याचे ठरते.

तसेच यामध्ये असलेले उच्च फायबर रक्तामधील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते व पचनाला देखील मदत करते व यासोबतच किडनीच्या आरोग्याला देखील मदत करू शकते.

5- ब्लूबेरी ब्लूबेरीमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. तसेच यामध्ये अँथोसायनीन्स  सारखे अँटीऑक्सिडंट असल्याने त्यामुळे जळजळ कमी होते व ऑक्सिडेटिव तणावापासून मोठ्या प्रमाणावर संरक्षण मिळते.

त्यासोबतच ब्लूबेरीमध्ये सोडियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस कमी असते व त्यामुळे किडनीच्या समस्या असलेल्या रुग्णांसाठी हे पूरक बनते. आहारामध्ये जर ब्लूबेरीचा समावेश केला तर रक्तदाब देखील नियंत्रणात ठेवण्यास मदत होते व किडनी स्टोनची वाढ रोखता येते.

( कुठलाही उपचार किंवा आहारात बदल करण्याअगोदर वैद्यकीय तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe