राहुरी : यंदा दुष्काळाने सर्वत्रच पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. अनेक ठिकाणी टॅंकर सुरू आहेत, तर काही ठिकाणी विहिरी, विंधनविहिरींचा आधार घेतला जात आहे. मिळेल तेथून पाणी आणून तृष्णा भागविली जात असताना काही ठिकाणी वादाच्या ठिणग्याही पडत आहेत.
मात्र, राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथे पाणी भरण्यासाठी आलेल्या दोन महिलांमध्ये झालेल्या वादातून एका महिलेचा कान तुटल्याने एकच खळबळ उडली आहे.

सोमवारी (दि. ३) सायंकाळी पाच वाजता ही घटना घडली. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, सोमवारी (दि. ३) सायंकाळी पाच वाजता राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथे संदीप दिवाकर कवाणे यांच्या शेतातील एअरवॉलजवळ महिला पाणी भरण्यासाठी आल्या होत्या.
याठिकाणी उषा साईनाथ शिंदे यांची मुलगी अस्मिता ही पाणी भरण्यासाठी गेली. यावेळी तिच्याबरोबर मंगल संदीप कवाणे, संदीप दिवाकर कवाणे, शोभा प्रकाश कवाणे यांनी भांडण करून तिला लाथाबुक्क्याने मारहाण केली.
हे भांडण सोडविण्यासाठी उषा शिंदे गेल्या असता मंगल कवाणे हिने त्यांचे केस धरून तसेच डाव्या कानातील टॉप्स जोरात ओढल्याने उषा शिंदे यांचा कान तुटून त्या जबर जखमी झाल्या. याप्रकरणी उषा शिंदे यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गन्हा दाखल केला आहे.
- शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी द्यावी यासाठी श्रीगोंद्यात चक्काजाम आंदोलन, प्रहार जनशक्ती पक्षाच्या इशारा
- सोन्याच्या किमतीत 2180 रुपयांची वाढ! 23 जुलै रोजी 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार?
- अहिल्यानगर जिल्ह्यातील एकल महिलांना सरकारी योजनांच्या माध्यमातून सक्षम करावे- जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
- कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
- ३१ जुलै पूर्वी शेतकऱ्यांनी खरिप पिक विमा भरून घ्यावा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांचे आवाहन