Ahmednagar News : केंद्रपुरस्कृत वित्त आयोग मार्फत राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचा बहुआयामी विकास होण्याच्या दृष्टीने बंधित व अबंधित स्वरुपात थेट ग्रामपंचायतीकडे निधी वर्ग केला जातो.या निधीतून स्थानिक गरजाधारीत पायाभूत सुविधा निर्मितीवर विशेष भर दिला आहे.
याबरोबर स्थानिक ग्रामीण भागातील नागरीकांच्या जीवनमानाच्या दर्जात वृध्दी, शैक्षाणिक, सामाजिक, आरोग्य विषयक सुविधांमध्ये दर्जोन्नोती व्हावी. या हेतूने ग्रामपंचायत विकास आराखडयांमध्ये विकास कामांचा अंतर्भाव करुन त्याची अंमलबजवणी शासन मार्गदर्शक सूचनांनूसार व्हावी.
यासाठी जिल्हा परिषद अहमदनगर मार्फत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या दशिादर्शक मार्गदर्शनाने यशस्वी वाटचाल सुरु आहे. यामुळे ग्रामीण भागाचा कायापालट होण्यास मदत होत आहे.
१५ व्या केंद्रीय वित्त आयोगामार्फत जिल्हायातील १३२२ ग्रामपंचायतींना ८७२.०८ कोटी अनुदान प्राप्त झाले असून, यामार्फत ग्रामपंचायतींना विहीत कालमर्यादेत थेट अनुदान वर्ग करण्यात आले आहे.
प्राप्त अनुदान शासन निकषानुसार खर्च करताना दर्जेदार गुणवत्तापुर्ण विकास कामांकडे मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ यांनी विशेष परिश्रम घेतले.
यामुळे फेब्रुवारीपर्यंत अहमदनगर जिल्हा परिषदेचा ग्रामपंचायत स्तरावर ४९०.८५ कोटी झालेला खर्च आज अखेर ६७४.७५ कोटी पर्यंत गेल्याने दि. २० मार्च रोजी दूरदृश्यप्रणाली द्वारे घेतलेल्या आढावा बैठकीत ग्रामविकास व पंचायतराज प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी अहमदनगर जिल्हयाचा ग्रामपंचायत स्तरावरील खर्चामध्ये राज्यात अव्वल क्रमांकावर असल्याचे सांगितले.