जामखेड :- नगरपरिषदेच्या प्रभाग १४ च्या पोटनिवडणुकीसाठी अर्जांच्या छाननीत सातपैकी एबी फार्म नसल्याने एक अर्ज बाद झाला. भाजप, काँग्रेस व शिवसेना यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तीन अपक्ष उमेदवारांची भर पडल्याने लढत रंगतदार होणार आहे.
सुरुवातीला भाजपतर्फे पठाण सलमा शाकीरखान यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता. परंतु पक्षाचा एबी फार्म पठाणऐवजी शेख जाकीया आयुब यांना देण्यात आला. त्यामुळे पठाण यांचा अर्ज अवैध ठरला. या राजकीय खेळीमुळे एक गट कमालीचा नाराज झाला आहे.

पालकमंत्री राम शिंदे यांच्या शब्दाला त्यांच्या कार्यकर्त्यांनी केराची टोपली दाखवली. शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख संजय काशिद यांची पत्नी रोहिणी यांनी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसच्या वतीने शेख परवीन सिरोजद्दीन यांनी पक्षाचा एक व अपक्ष एक असे दोन अर्ज दाखल केले आहेत.
मैनाबाई ज्ञानदेव सदाफुले व छाया संतोष गुंदेचा यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुहास जगताप यांनी अर्ज स्वीकारले. अर्जाची छाननी होऊन सहा उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत.
- डी-मार्टची फ्रँचायझी मिळते का? जाणून घ्या संपूर्ण सत्य आणि भागीदारीची संधी
- फक्त ‘या’ महिलांनाच मिळणार लाडकी बहीण योजनेचा हप्ता; केवायसी अपूर्ण, चुकीची असल्यास पैसे अडकणार
- पुणे पोलीस भरतीला अखेर हिरवा कंदील; फेब्रुवारीत मैदानी चाचणी, शहराच्या सुरक्षेला मिळणार बळ
- प्रस्तावित शेतकरी कर्जमाफी योजनेला दिवंगत अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- मासिक ८० हजार पगारात ५० लाखांचे घर शक्य आहे का? आर्थिक तज्ज्ञांचा स्पष्ट इशारा













