‘या’ दिवसापासून सुरु होऊ शकतात शाळा

Published on -

देशभरात कोरोनाने हाहाकार उडवला. संबंध देश त्यामुळे बंद करण्यात आला. महाराष्ट्रात कोरोनाने जास्तच रुग्णसंख्या काबीज केली. या दरम्यान सर्व व्यवहारासह शाळा, कॉलेज बंद आहेत.

त्यामुळे शाळा कधी उघडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले असताना राज्य सरकार 15 जूनपासून शाळा पुन्हा सुरू करण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे.

माध्यमांशी बोलताना राज्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी तसे संकेत दिले आहेत. राज्यातील शाळा हळूहळू सुरू करण्यात येतील. पहिल्या टप्प्यात रेड झोन नसलेल्या भागात शाळा सुरू करण्यात येतील. आठवड्यातले 48 तास शाळा सुरु ठेवण्याचे प्राथमिक नियोजन आहे.

शनिवार-रविवार अशी सुट्टी देणाऱ्या शाळांना ती मुभा नसेल असंही वर्षा गायकवाड यांनी नमूद केलं आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आणि रेड झोनमधील अन्य 15 शहरे आहेत.

मात्र हळूहळू शाळा सुरु करण्याचा विचार राज्य सरकार करतं असल्याचं गायकवाड यांनी म्हटलं आहे. शाळा सुरु करण्यासंदर्भात दोन पर्याय शिक्षणमंत्र्यानी दिले आहेत.

पहिल्या पर्यायात विद्यार्थ्यांना सम विषम रोलनुसार वेगवेगळ्या शिफ्टमध्ये बोलवण्यात येईल. त्यात सकाळच्या सत्रात आणि दुपारच्या सत्रात बोलवायचा विचार केला जात आहे.

दुसरा पर्याय म्हणजे प्रत्येक पर्यायी दिवशी प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांच्या तुकडीला कॉल करून एक दिवसाआड शाळेत बोलवायचं. तसंच प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांचे दोन गट करण्यात येतील.

कोणत्याही परिस्थितीत सोशल डिस्टन्सिंग ठेवून एका डेस्कवर फक्त एका विद्यार्थ्याला परवानगी असेल अशा सूचना देण्यात येतील.

या दोन पर्यायांचा विचार राज्य सरकार करत असून शाळा सुरु झाल्या तरीही एका बाकावर एकच विद्यार्थी बसेल याची काळजी शाळांना घ्यायची आहे असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe