Maruti Suzuki Car : होळीच्या निमित्तीने मारुती सुझुकीच्या ‘या’ गाड्या झाल्या स्वस्त; ‘इतक्या’ लाखांची होणार बचत!

Maruti Suzuki

Maruti Suzuki Car Holi Offers 2024 : होळीच्या निमित्ताने कार कंपन्या ग्राहकांना मोठ्या ऑफर देत आहेत. या ऑफर अंतर्गत ग्राहक अत्यंत स्वस्त दरात आपली आवडती वाहने खरेदी करू शकतात. मारुतीने आपल्या ग्राहकांसाठी होळीच्या निमित्ताने आकर्षक ऑफर्सही आणल्या आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे.

कार कंपन्या त्यांच्या मॉडेल्सवर बंपर डिस्काउंट देत आहेत. यातच मारुती सुझुकी देखील आपल्या ग्रँड विटारा वर ग्राहकांना बंपर सूट देत आहे. ही सूट कधी पर्यंत लागू आहे पाहुयात.

जर तुम्ही होळीच्या मुहूर्तावर कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही मारुती ग्रँड विटाराचा स्वस्तात घरी आणू शकता. कंपनी या वाहनावर मोठी ऑफर देत आहे. कंपनी मारुती ग्रँड विटारावर 1 लाख रुपयांपेक्षा जास्त सूट देत आहे. भारतीय बाजारात ही कार सहा व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही या ऑफरचा लाभ 31 मार्च 2024 पर्यंतच घेऊ शकता.

कपंनी सध्या मारुती ग्रँड विटारावर 1.02 लाख रुपयांची बंपर सूट आहे. मारुती ग्रँड विटारा भारतीय बाजारपेठेत एकूण सहा प्रकारांमध्ये उपलब्ध आहे, यामध्ये सिग्मा, डेल्टा, झेटा, झेटा प्लस, अल्फा आणि अल्फा प्लस प्रकारांचा समावेश आहे.

या सर्व पाच सीटर गाड्या आहेत. अशा परिस्थितीत, होळी कार ऑफर अंतर्गत, या कारवर 1.02 लाख रुपयांपर्यंत सूट उपलब्ध आहे. या गाड्यांच्या बेस व्हेरिएंटच्या एक्स-शोरूम किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याची किंमत सुमारे 10.80 लाख रुपये आहे, तर टॉप व्हेरिएंटची किंमत 20.09 लाख रुपये आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe