Farmtrac Atom 35 Tractor: शेती व फळबागाकरिता मिनी ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर फार्मट्रॅकचा ‘हा’ ट्रॅक्टर ठरेल फायद्याचा! वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

Ahmednagarlive24 office
Published:
Farmtrac Atom 35 Tractor

Farmtrac Atom 35 Tractor :- भारतीय शेती क्षेत्रामध्ये फार्मट्रेक कंपनी शेतीसाठी यंत्रे किंवा उपकरणे तयार करण्यासाठी प्रसिद्ध असून या कंपनीचे ट्रॅक्टर तसेच हार्वेस्टर व इतर शेतीला आवश्यक असलेली उपकरणे खूप लोकप्रिय आहेत.

फार्मट्रेक कंपनीचे ट्रॅक्टर हे उच्च दर्जा व प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले असतात. त्यामुळे शेतीसाठी फार्मट्रॅक कंपनीचे अनेक ट्रॅक्टर मॉडेल शेतकऱ्यांमध्ये प्रसिद्ध आहेत.

त्यामुळे तुम्हाला जर शेती किंवा फळबागातील कामांसाठी मिनी ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर तुम्ही फार्मट्रेक ॲटम 35 हा ट्रॅक्टर घेऊ शकतात. या लेखात आपण या ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये आणि किंमत इत्यादी बद्दल महत्वाची माहिती आपण घेणार आहोत.

Farmtrac Atom 35 मिनी ट्रॅक्टरचे वैशिष्ट्ये

या ट्रॅक्टरमध्ये 1758 सीसी क्षमतेसह चार सिलेंडर मध्ये शक्तिशाली इंजिन देण्यात आलेले असून जे 35 एचपी पावरसह 110 एनएम टॉर्क जनरेट करते. कंपनीच्या या ट्रॅक्टरमध्ये चांगल्या दर्जाचे एअर फिल्टर देण्यात आलेले असून या ट्रॅक्टरची कमाल पिटीओ पावर 29 एचपी आहे व त्याची इंजिन 2700 आरपीएम जनरेट करते.

फार्मट्रेक कंपनीच्या या मिनी ट्रॅक्टरमध्ये 30 लिटर क्षमतेची इंधन टाकी देण्यात आलेले आहे व याचे हायड्रोलिक क्षमता 1200 किलो या ट्रॅक्टरचे वजन 1400 किलो ठेवण्यात आलेले आहे. महत्त्वाचे म्हणजे हा मिनी ट्रॅक्टर अतिशय मजबूत व्हील बेससह तयार करण्यात आला आहे.

तसेच या ट्रॅक्टरमध्ये पावर स्टेरिंग देण्यात आलेली असून नऊ फॉरवर्ड आणि तीन रिव्हर्स गिअर सह गिअरबॉक्स यामध्ये आहे. तसेच फार्मट्रॅक कंपनीच्या या मिनी ट्रॅक्टरमध्ये सिंगल/ डबल क्लच देण्यात आलेला असून

यामध्ये कॉस्टंट मेश प्रकारचे ट्रान्समिशन मिळते. हा ट्रॅक्टर चार व्हील ड्राईव्ह मध्ये येतो. या ट्रॅक्टरचे पुढील टायर 6.00×12 आणि मागील टायर 9.50×20 आकाराचे आहेत.

किती आहे Farmtrac Atom 35 मिनी ट्रॅक्टरची किंमत?

या ट्रॅक्टरची भारतात एक्स शोरूम किंमत सहा लाख 37 हजार ते सहा लाख 45 हजार रुपये ठेवण्यात आलेले असून आरटीओ नोंदणी आणि रोड टॅक्समुळे या ट्रॅक्टरची किंमत राज्यानुसार बदलू शकते. याशिवाय कंपनीने या ट्रॅक्टर सोबत पाच वर्षाची वॉरंटी दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe