अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनामुळे बलात्कारातील 7 वर्षे फरार आरोपी सापडला !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :- गावातील एका महिलेवर बलात्कार करून फरार झालेला व पोलिसांना तब्बल सात वर्षे गुंगारा देणारा एक आरोपी अखेर करोनाच्या साथीमुळं पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

कोरोनाच्या साथीच्या भीतीने तो मूळ गावी परतला आणि पकडला गेला. पांडुरंग य‌शवंत शेंगाळ (वय ५२) असं आरोपीचं नाव असून तो संगमनेर तालुक्यातील आहे.

२०१३ मध्ये गावातील महिलेवर बलात्कार करून शहरात पळून गेला होता. आरोपी शेंगा‌ळच्या विरुद्ध घारगाव पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता.

तेव्हा पोलिसांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. ओळख लपवून राहत असल्यानं त्याला पकडण्यात नगरच्या पोलिसांना अद्याप यश आलं नव्हतं. करोनाची साथ आल्यानंतर पुण्या-मुंबईतील नागरिक गावाकडे परतत आहेत.

साथीच्या आजाराला घाबरून शेंगाळही गावी परतला होता. संगमनेर तालुक्यातील शेंगाळवाडी परिसरातील डोंगराळ भागात तो राहत होता. इथंही तो खरं नाव आणि ओळख लपवून राहत होता.

मात्र, तो गावी परतल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकानं डोंगराळ भागात जाऊन त्याला पकडले.

ग्रामस्थांच्या मदतीनं त्याची ओळख पटविण्यात आली. पुढील कारवाईसाठी त्याला घारगा‌व पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. सात वर्षे तो कोणत्या शहरात लपून बसला होता याचाही तपास करण्यात येत आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment