Health Tips: तुम्ही देखील प्लास्टिकच्या बाटली मधून पाणी पिता का? तर पाणी पिण्याअगोदर हे वाचाच, होईल फायदा!

Ajay Patil
Published:
plastic water bottel

Health Tips:- जेव्हा आपण प्रवासाला निघतो तेव्हा आपल्याला पाण्याची तहान लागते तेव्हा आपण सर्रासपणे एखाद्या दुकानावर थांबतो आणि मिनरल्स वॉटरची बॉटल विकत घेऊन त्यातील पाणी पिऊन आपली तहान भागवतो. अशाप्रकारे बाहेर मिनरल्स वॉटरची बॉटल विकत घेऊन पाणी पिण्याचे प्रमाण हे उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये जास्त प्रमाणामध्ये वाढल्याचे आपल्याला दिसून येते.

तसेच बऱ्याचदा आपण जेव्हा बाहेर पाण्याची बाटली विकत घेतो व त्यातील पाणी पिऊन झाल्यावर तीच बाटली घरी आणतो. परत घरी दररोज त्यामध्ये पाणी भरून त्याच बाटलीचा वापर पाणी पिण्यासाठी आपण करत असतो.

परंतु ही बाब किंवा ही सवय जर तुम्हाला असेल तर ती आरोग्याकरिता फायद्याचे आहे का? हा प्रश्न कधी तुम्ही तुमच्या मनाला विचारला आहे का? कारण ही जी काही तुम्हाला सवय आहे ती तुमच्या आरोग्याला घातक ठरू शकते.

 प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिण्याचे काय होऊ शकते नुकसान?

प्लास्टिकच्या बाटली मधून जेव्हा आपण पाणी पितो तेव्हा त्यामध्ये अतिशय सूक्ष्म आकाराचे मायक्रोप्लास्टिक्सचा अंतर्भाव असतो. जेव्हा प्लास्टिकचे विघटन केले जाते व विघटन करून झाल्यानंतर उरलेल्या प्लास्टिकचे सूक्ष्म घटक व सिंथेटिक कापडातून निघणारे सूक्ष्म प्लास्टिक अशा विविध पद्धतीने आपल्या पिण्याच्या पाण्यात बारीक तुकडे यांच्या स्वरूपात राहते किंवा आढळू शकते.

विशेष म्हणजे या मायक्रोप्लास्टिकचे हे कण पाच मिलिमीटर पेक्षा देखील लहान आकाराचे असतात. एवढेच नाही तर अशा पद्धतीचे कण हे पिण्याचे पाणी तसेच हवा, तलाव इत्यादी ठिकाणी देखील असण्याची शक्यता असते व अशा सूक्ष्म कणांमुळे आपल्या शरीरावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो.

 शरीरावर काय होऊ शकतात परिणाम?

आपण अशा प्लास्टिकच्या बाटली मधून पाणी पितो तेव्हा त्या पाण्यासोबत काही प्रमाणात मायक्रोप्लास्टिक आपल्या पोटामध्ये जाते. याशिवाय अशा पद्धतीच्या प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी पिण्यामुळे अनेक घातक प्रकारचे रासायनिक घटक शरीरात सहजपणे प्रवेश करतात.

यामुळे वजन वाढणे तसेच इन्सुलिन प्रतिकार, प्रजनन क्रियेची पातळी खालवणे आणि कर्करोगासारखे भयंकर आजार होण्याची शक्यता बळावते. अजून अनेक प्रकारे या विषयावर अभ्यास आणि संशोधन सुरू आहेत. परंतु सध्या तरी आपण यापासून स्वतःचा बचाव करणे खूप गरजेचे आहे.

 प्लास्टिकच्या बाटल्यांचा पिण्याच्या पाण्यासाठी वापर कसा कमी करता येईल?

पाणी पिण्यासाठी सगळ्यात अगोदर म्हणजे काचेच्या, स्टेनलेस स्टीलच्या बाटल्यांचा वापर करावा किंवा बीपीए मुक्त प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करणे गरजेचे आहे. कारण या प्रकारच्या बाटल्या जर वापरल्या तर ते पर्यावरणासाठी चांगले आहेच.

परंतु शरीरात जाणाऱ्या मायक्रो प्लास्टिकचे प्रमाण देखील खूप कमी होण्याची शक्यता यामध्ये असते. याशिवाय तुम्ही घरामध्ये पाणी स्वच्छ करून देणारी फिल्टरेशन सिस्टम बसून घेणे गरजेचे आहे. यामुळे सिस्टम मधून येणारे पाण्यातील घातक अशुद्ध घटक तसेच मायक्रो प्लास्टिक गाळून घेतले जाते व त्यामुळे तुम्हाला घातक घटकांविरहित पाणी प्यायला मिळू शकते.

यावरून आपल्याला दिसून येते की, प्लास्टिकच्या बाटली मधून जर वारंवार पाणी पिले तर ते शरीरासाठी धोकादायक ठरते. त्यामुळे जर तुम्ही कुठे बाहेर जात असाल तर तुम्ही स्टेनलेस स्टीलची बाटली सोबत ठेवणे गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe