कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेले मंत्री अशोक चव्हाण अहमदनगर मध्ये आले आणि….

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :- सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर नांदेडहून ते रुग्णवाहिकेतून मुंबईला रवाना झाले. नगरमध्ये काँग्रेसचे नेते विनायक देशमुख यांच्या घरून आणलेला चहा त्यांनी घेतला.

मुंबईला जाण्यासाठी विशेष विमान उपलब्ध न झाल्यामुळे चव्हाण यांना रुग्णवाहिकेतून जावे लागले. दुपारी रस्त्यात असतानाच त्यांच्या स्वीय सहायकाचा देशमुख यांना फोन आला.

आम्ही नगरमार्गे जात आहोत. साहेबांना चहा घ्यायचाय. तुम्ही बिनसाखरेचा घरी बनवलेला चहा घेऊन शासकीय विश्रामगृहाजवळ थांबा. आमच्या मागे तुमची गाडी घ्या, असे त्यांनी सांगितले.

साडेपाच वाजता रूग्णवाहिकेसह पोलिसांच्या गाड्यांचा ताफा शहरातून पुढे गेला. पुणे रस्त्यावरील बायपासच्या पुढे हा ताफा थांबला. रूग्णवाहिकेत चव्हाण व एक डॉक्टर होते.

डॉक्टरांच्या परवानगीने मागचे दार उघडले. चव्हाण यांनी अत्यंत प्रफुल्लित मुद्रेने नमस्कार केला. त्यांच्या चेहऱ्यावर कोणताही तणाव जाणवत नव्हता.

देशमुख यांनी त्यांना दिलेला चहा घेऊन ते मुंबईकडे रवाना झाले. यावेळी जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस हर्षवर्धन देशमुख, मुकुल देशमुख उपस्थित होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment