Upcoming IPO:- सध्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे गुंतवणूकदारांचा कल वाढल्याचे दिसून येत असून अनेक जण इक्विटी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करताना आपल्याला दिसून येत आहेत. एक एप्रिल पासून आर्थिक वर्ष 2024-25 ची सुरुवात झाली व एप्रिल हा या आर्थिक वर्षाचा पहिला महिना आहे.
बरेच गुंतवणूकदार आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याला पसंती देतात व हा एक चांगला पर्याय असतो. जर आपण एकंदरीत शेअर बाजाराचा अभ्यास केला तर गेल्या काही कालावधीपासून प्रत्येक आठवड्याला कुठल्या न कुठल्या कंपनीच्या आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होताना आपल्याला दिसून येत आहेत.
अगदी याच पद्धतीने आता या नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये काही कंपन्यांचे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत. याविषयीची माहिती या लेखात घेऊ.
भारती हेक्साकॉमचा आयपीओ येणार 3 एप्रिलला
भारतीय हेक्साकॉमचा आयपीओ तीन एप्रिल 2024 रोजी खुला होणार असून 5 एप्रिल 2024 रोजी तो बंद होणार आहे. त्यानंतर 12 एप्रिल 2024 रोजी भारतीय हेक्साकॉमचा शेअर्स लिस्टिंग केला जाणार आहे. आयपीओमधील या शेअर्सची किंमत 542 ते 570 रुपये असून कंपनी या आयपीओच्या माध्यमातून 4275 कोटी रुपये उभारणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.
हा मेनबोर्ड आयपीओ असून त्याची लॉट साईज 26 शेअर्स इतकी आहे. तसेच तुम्हाला जर या आयपीओ करिता अर्ज करायचा असेल तर तो किमान 26 शेअरसाठी आणि नंतर त्याच्या पटीमध्ये अर्ज करावा लागणार आहे.
या कंपन्यांचे आयपीओ येण्याची शक्यता
भारती हेक्साकॉम सोबतच बालाजी स्पेशालिटी, वन मोबीकी सिस्टीम, हेल्थविस्टा इंडिया, कॉनकॉर्ड एनवायरो, बालाजी सोलुशन, एसएसबीए इनोव्हेशन, एन्व्हायरो इन्फ्रा आणि आर अँड बी इन्फ्रा प्रोजेक्ट यासारख्या कंपन्यांचे आयपीओ लॉन्च होण्याची शक्यता आहे. परंतु अजून पर्यंत या कंपन्यांच्या आयपीओच्या लॉन्चिंगची तारीख मात्र निश्चित नाही.
एसएमई विभागामध्ये होणार हे आयपीओ लॉन्च
1- ब्लू पेबल– ब्लू पेबल 3 एप्रिल रोजी एनएसई एसएमई विभागांमध्ये लिस्टिंग होतील. आयपीएलची प्राईस बँड हा 159 ते 168 रुपयांचा असून या माध्यमातून 18.14 कोटी रुपये उभारण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. हा आयपीओ 26 ते 28 मार्च या कालावधीत गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आलेला होता.
2- वृद्धी इंजीनियरिंग वर्क्स– हा आयपीओ 3 एप्रिल रोजी सेकंडरी मार्केटमध्ये प्रवेश करण्याची अपेक्षा असून 65 ते 70 रुपयांच्या प्राईज बँडमध्ये 6.8 लाख रुपयांचे नवीन शेअर्स जारी करून 4.76 कोटी रुपये उभारण्याचे या कंपनीचे उद्दिष्ट आहे.