प्रचंड उष्णतेमुळे उन्हाळी लागली तर करा ‘हा’ घरगुती उपाय! काही वेळातच जळजळ होईल कमी

Ajay Patil
Published:
heat wave

प्रचंड उष्णता असल्याने घामाने माखलेले शरीर आणि अंगाची लाही लाही करणारा उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून वाढत्या उन्हामुळे अनेक प्रकारचे त्रास नागरिकांना होत असतात. त्यातील उष्माघात हा सर्वात गंभीर प्रकार असून त्यामुळे व्यक्तीचा जीव देखील जाऊ शकतो.

अशाप्रसंगी या उष्णतेच्या कालावधीमध्ये  शक्यतो बारा ते तीन या कालावधीमध्ये बाहेर न पडलेले योग्य राहते. परंतु तरीदेखील काही अत्यावश्यक काम असेल व बाहेर पडावे लागले तर तुम्ही रुमाल तसेच अंगावर सुती कपडे, सन ग्लासेस वगैरे तयारी करूनच बाहेर निघणे हिताचे ठरू शकते.

तसेच या कालावधीत भरपूर पाणी पिणे देखील खूप महत्त्वाचे आहे. या अनुषंगाने प्रचंड उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासांच्या अनुषंगाने बघितले तर यामध्ये उन्हाळी लागणे म्हणजेच लघवी करताना जळजळ होणे हा एक विशिष्ट प्रकारचा त्रास असून त्यामुळे व्यक्ती खूप मोठ्या प्रमाणावर त्रस्त होते.

या त्रासापासून वाचण्याकरिता भरपूर प्रमाणात थंड पाणी पिणे किंवा थंड पाण्यामध्ये पाय बुडवून बसणे यासारख्या अनेक उपाययोजना केल्या जातात. परंतु तरी देखील फरक पडताना दिसून येत नाही. याकरिता आयुर्वेदामध्ये उन्हाळी लागल्यावर नेमके काय करावे? याबद्दल माहिती दिलेली आहे.

 उन्हाळी लागल्यावर करावा हा घरगुती उपाय

सध्या राज्यांमध्ये बरेच ठिकाणी 40°c पेक्षा उन्हाचा पारा कुठे गेला असून त्याचा अनेकांना त्रास होताना आपल्याला दिसून येत आहे. यातील प्रमुख त्रास म्हणजे उन्हाळी लागणे हे होय. जेव्हा आपण लघु शंका करतो तेव्हा प्रचंड प्रमाणात जळजळ म्हणजेच दाह होते. कोणत्याही कामांमध्ये लक्ष लागत नाही.

जर असा प्रकार तुमच्या सोबत घडला तर सगळ्यात आगोदर यावर उपाय म्हणून तुम्ही खडीसाखर, धने आणि तुळशीची बी चा वापर करू शकता. याकरिता तुम्हाला धने, खडीसाखर आणि तुळशीचे बी घालून पाणी प्यावे लागेल. आपण लघवी करताना शरीरातून जे काही मूत्र बाहेर पडते त्याचे स्वरूप व प्रमाण यावरून तुम्ही योग्य प्रमाणामध्ये पाणी पीत आहेत की नाही हे समजते.

जर लघवी ही कुठलाही त्रास न होता व योग्य प्रमाणामध्ये होत असेल तर शरीरात पाण्याचे प्रमाण बरोबर आहे समजावे. उन्हाळी लागली असल्यास रात्री झोपताना मातीच्या मटक्यामध्ये खडीसाखर, धने व तुळशीच्या बिया भिजत घालाव्या व सकाळी कुस्करून गाळून ते पाणी प्यावे. त्यामुळे उत्तम पद्धतीने आराम मिळतो.

तसेच उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा डोळ्यांची जळजळ होण्याची समस्या देखील उद्भवते. जर अशा पद्धतीने डोळ्यांची जळजळ होत असेल तर ती कमी करण्यासाठी दूध किंवा गुलाबजलाच्या पट्ट्या डोळ्यांवर ठेवाव्यात. तसेच उन्हातून बाहेरून आल्यानंतर लगेच डोळे थंड पाण्याने न धुता थोडा कालावधी जाऊ देऊन नंतर थंड पाण्याने डोळे धुवावेत.

तसेच गुलकंद किंवा सेंद्रिय पद्धतीने तयार केलेला गूळ खाल्ला तरी उन्हाळीचा त्रास कमी होण्याची शक्यता असते. जास्त उन्हाळी चा त्रास होत असेल तर चंदन उगाळून पाणी पिले तर त्याची तीव्रता कमी होते असे देखील आयुर्वेद तज्ञ म्हणतात. परंतु जास्तच त्रास होत असेल तर वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे हितावह ठरते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe