Post Office Scheme: पोस्टाच्या ‘या’ योजनेत एकदा कराल गुंतवणूक तर वर्षाला मिळतील 36,996 रुपये! वाचा या योजनेचे कॅल्क्युलेटर

Published on -

Post Office Scheme:- प्रत्येक व्यक्ती गुंतवणूक करण्यासाठी खात्रीशीर आणि उत्तम परतावा मिळेल व केलेली गुंतवणूक अगदी सुरक्षित राहील या दृष्टिकोनातून गुंतवणूक पर्यायांच्या शोधात असते. या अनुषंगाने विविध बँकांच्या मुदत ठेव योजना, सरकारच्या अल्पबचत योजना व पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांना मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते.

कारण या सगळ्या प्रकारच्या गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणुकीची सुरक्षितता तर राहतेच.परंतु खात्रीशीरित्या चांगला परतावा मिळतो. या अनुषंगाने जर आपण पोस्ट ऑफिसच्या योजना पाहिल्या तर  अनेक योजना आहेत.

त्यापैकी पोस्ट ऑफिसची एमआयएस म्हणजेच पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम योजना देखील खूप महत्वपूर्ण असून या योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना हमी परतावा मिळतो. विशेष म्हणजे या माध्यमातून गुंतवणूकदारांना वैयक्तिक किंवा संयुक्त खाते उघडण्याची मुभा आहे.

 काय आहे पोस्ट ऑफिसची मंथली इन्कम स्कीम?

पोस्ट ऑफिसची ही एक महत्वपूर्ण योजना असून यामध्ये तुम्हाला पुन्हा पुन्हा गुंतवणूक करण्याची गरज भासत नाही. म्हणजेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला यामध्ये एकरकमी गुंतवणूक करावी लागते. सध्या या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर वार्षिक 7.4 टक्के दराने व्याज मिळत आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खाते उघडावे लागेल. त्या ठिकाणी केवायसी फॉर्म भरून सोबत पॅन कार्डची प्रत जोडावी लागेल. समजा तुम्ही एकापेक्षा दोन व्यक्ती म्हणजे संयुक्त खाते उघडले तर इतर सदस्यांचे पॅन कार्ड जोडणे देखील गरजेचे आहे.

या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेमध्ये गुंतवणूकदारांना केलेल्या गुंतवणुकीवर प्रत्येक महिन्याला व्याज मिळते. खाते उघडताच आणि खाते परिपक्व होईपर्यंत प्रत्येक महिन्याच्या शेवटी व्याज जोडले जाते. या योजनेचा व्याजदर तिमाहीत सुधारित केला जातो व ही पाच वर्ष कालावधीची योजना आहे.

खाते उघडल्यानंतर एक वर्षापर्यंत गुंतवणूकदारांना या खात्यातून पैसे काढता येत नाहीत. समजा गुंतवणूकदाराने तीन वर्षांपूर्वी खाते बंद केले तर जी तुमची मूळ रक्कम गोळा झालेली असते त्या रकमेतून  दोन टक्के रक्कम वजा केली जाते व तीन वर्षे झाल्यानंतर खाते बंद केले तर एक टक्के कपात होते.

जर आपण या योजनेमध्ये गुंतवणुकीची मर्यादा पाहिली तर एका खात्यामध्ये कमाल 15 लाख रुपये आणि किमान एक हजार रुपये गुंतवता येतात.

 या योजनेतून कसे मिळतील एका वर्षात 36 हजार 996 रुपये?

तुम्ही पोस्ट ऑफिसच्या मंथली इनकम स्कीममध्ये जर पाच लाख रुपये एकरकमी गुंतवले असतील तर या गुंतवलेल्या पाच लाखावर तुम्हाला 7.4% व्याजदराने व्याज मिळेल व हे व्याज प्रत्येक महिन्याला 3083 रुपये इतके असेल. अशाप्रकारे जर तुम्ही हिशोब केला तर एका वर्षामध्ये व्याजापोटी तुम्हाला 36 हजार 996 रुपये उत्पन्न मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe