8 ते 10 लाख रुपयांचा नफा मिळवायचा असेल तर करा गिनी फाऊल पक्ष्याचे पालन! वाचा ए टू झेड माहिती

Published on -

कृषी क्षेत्राशी निगडित अनेक प्रकारचे व्यवसाय सध्या शेतकरी करत असून यामध्ये पशुपालन आणि शेळीपालन व त्यासोबत कुक्कुटपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. तसेच अशा व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना शेतकऱ्यांना मदत करत आहेत.

जर आपण कुक्कुटपालनाशी संबंधित पाहिले तर हा व्यवसाय आता व्यावसायिक दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. तसेच बटेर पालन ही नवीन संकल्पना आता वेगाने वाढत असून या माध्यमातून देखील शेतकरी आता चांगला नफा मिळवत आहेत.

यासारखाच जर तुम्हाला शेतीला एखादा जोडधंदा करायचा असेल तर तुम्ही गिनी फाऊल पक्षाचे पालन करू शकतात. या पक्षी पालनातून तुम्ही कमी खर्चामध्ये आठ ते दहा लाख रुपयांचा नफा मिळवू शकतात. या पक्षाचे पालन तुम्ही कमी खर्चामध्ये करू शकता व चांगला नफा मिळवणे यामध्ये शक्य आहे.

 गिनी फाऊल पक्षी नेमका कसा असतो?

बाजारामध्ये अंडी आणि मांस यांची मागणी सातत्याने वाढत आहे व त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर कोंबडी तसेच बटेर व इतर  अनेक पक्षांच्या प्रजातींचे पालन करताना आपल्याला दिसून येत आहेत. यामध्ये गिनी फाऊल बर्ड म्हणून ओळखली जाणारी एक पक्षाची जात असून ते आफ्रिकेच्या गिनी बेटावर सर्वाधिक प्रमाणात आढळून येतात.

हा एक विदेशी पक्षी असून तो कमीत कमी खर्चात पाळला जातो व कमी वेळात चांगला नफा देणारा पक्षी म्हणून ओळखला जातो. लहान आणि मध्यम स्तरावरील शेतकरी कमीत कमी खर्चात आणि कमी वेळेत गिनी फाऊल पक्ष्यांचे संगोपन करून मोठा नफा कमवू शकतात.

 गिनी फाऊल पक्ष्यांच्या संगोपनातून दरवर्षी मिळेल आठ ते दहा लाख रुपये नफा

हा कमी खर्चाचा आणि फायदेशीर पक्षी मानला जातो व याचे संगोपन आणि देखभाल करण्यासाठी फारच कमी खर्च येतो. विशेष म्हणजे या पक्षाच्या देखभालीसाठी वेगळ्या पद्धतीची कुंपण बांधण्याची गरज नसून ज्या शेतकऱ्याकडे जमीन आहे असे शेतकरी गिनी फाऊल पक्षाचे पालन करून चांगले उत्पन्न मिळवू शकतात.

त्यासोबतच या पक्षाच्या खाद्यावर जास्त खर्च करण्याची गरज नसते. अगदी तुम्ही घरामागील अंगण, मोकळ्या शेतामध्ये यांचे पालन आरामात करू शकतात. आज भारतातील अनेक राज्यातील शेतकरी या पक्षांचे संगोपन करून त्यांची अंडी आणि मांस उत्पादनातून लाखो रुपये कमवत आहेत.

बिहार राज्यांमध्ये या पक्षाचे पालन मोठ्या प्रमाणावर केले जात असून त्या ठिकाणी अनेक शेतकरी दरवर्षी आठ ते दहा लाख रुपये कमवतात.

अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही 1000 गिनी  फाऊल पक्षाचे पालन केले तर तुम्हाला दीड ते दोन लाख रुपये खर्च करावा लागतो व त्यांच्या संगोपन करून तुम्हाला काही पटींनी जास्त नफा मिळतो.

 गिनी फाऊल पक्षांचे पालन कसे करतात?

जर तुम्हाला कोंबडी पालनाचा अनुभव असेल तर तुम्ही या पक्षाचे मोठ्या प्रमाणावर पालन करू शकतात. कारण कुक्कुटपानासारखे ज्याच्या संगोपनाच्या पद्धती आहेत. परंतु सुरुवातीला तुम्ही अगदी 20 ते 50 गिनी फाऊल पक्षाची पिल्ले घेऊन छोट्या प्रमाणामध्ये सुरुवात करू शकतात.

तुम्हाला यामध्ये अनुभव मिळेल व हळूहळू यामध्ये तुम्ही वाढ करू शकतात. तुम्हाला जर गिनी फाऊल पक्षी संगोपनाकरिता माहिती हवी असेल तर तुम्ही सेंट्रल बर्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, बरेली या ठिकाणी संपर्क साधू शकता व त्या ठिकाणी तुम्हाला प्रशिक्षण आणि पिल्ले देखील मिळतात.

 गिनी फाऊल पक्ष्याची वैशिष्ट्ये

1- सामान्यपणे कुक्कुटपालनाच्या तुलनेत या पक्षाच्या संगोपनासाठी शेतकऱ्यांना केवळ साठ ते सत्तर टक्के खर्च करावा लागतो.

2- हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळ्याच्या या पक्षावर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे कोंबड्यांपेक्षा हे पक्षी कमी आजारी पडतात.

3- तसेच पक्षांची ही जात खूप कमी प्रमाणात आजारी पडत असल्यामुळे देखभालीवर जास्त खर्च करावा लागत नाही.

4- गिनी पक्ष्यांची अंडी बरेच दिवस टिकून राहतात व ते खराब होत नाहीत. साधारणपणे या पक्षाची अंडी पंधरा ते वीस दिवस साठवता येतात.

5- गिनी फाऊल पक्षी सुमारे 90 ते 100 अंडी घालतो.

6- कोंबडीच्या अंड्याच्या तुलनेत या पक्षाची अंडी दोन ते अडीच पट जाड आणि मोठी असतात.

7- तसेच या पक्षाची अंडी सहजपणे फुटत नाहीत व कोणत्याही प्रकारची नुकसान न करता तुम्ही कुठल्याही राज्यातील बाजारपेठेमध्ये अगदी सहजतेने पाठवू शकतात.

8- बाजारामध्ये गिनी फाऊल पक्षाचे एक अंडे 17 ते 20 रुपये दराने विकले जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe