अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारवर स्थलांतरित मजुरांचा छळ केल्याचा आरोप केल्यानतंर राजकारण चांगलेच तापू लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी योगींच्या त्या वक्तव्याचा समाचार घेत जनतेच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज तुम्हाला आहे असा टोला लगावला आहे.
रोहित पवारांनी यावर ट्विटरच्या माध्यमातून भाष्य करताना, महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान असलेल्या स्थलांतरित मजुरांनी स्वगृही जाण्याचा आग्रह धरल्यानंतर मविआ सरकारने सीएम फंडातून त्यांच्या प्रवासाची सोय केल्याचे म्हटले आहे.
त्याचबरोबर या मजुरांना आज क्वारंटाईन करण्याची, त्यांची अधिकाधिक टेस्ट करण्याची, त्यांना रोजगार देण्याची खरी गरज आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्र सरकारवर आगपाखड करण्यापेक्षा राज्यामध्ये अधिकाधिक कोरोना टेस्ट करून जनतेच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला देखील रोहित पवारांनी दिला आहे.
तसेच राज्यात परराज्यातून येणाऱ्या प्रत्येक मजुरांची पोलीस नोंदणी व आरोग्य तपासणी करूनच त्यांना महाराष्ट्रात प्रवेश द्यावा कारण अशा कोणत्याही नोंदी योगी सरकारकडे नसल्याचे स्पष्ट झाल्याचा सल्ला त्यांनी महाराष्ट्र सरकारला दिला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com