तुमच्या घराची टेरेस बनेल पैसे कमावण्याचे साधन! टेरेसचा असा उपयोग करा आणि पैसे कमवा

Ajay Patil
Published:

पैसा हे जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले साधन असल्यामुळे आपण पैसा कमावण्यासाठी नोकरी किंवा व्यवसाय करत असतो. परंतु महागाईच्या या कालावधीमध्ये बऱ्याच जणांना कमावलेला पैसा हा पुरत नाही किंवा कमी उत्पन्न असल्यामुळे पैशांची कायम अडचण भासते.

त्यामुळे बरेच व्यक्ती अतिरिक्त उत्पन्न मिळावे याकरिता अनेक साइड इन्कम स्त्रोतांच्या शोधामध्ये असतात. म्हणजेच नोकरी किंवा व्यवसाय करताना आपल्याला अतिरिक्त कुठल्या मार्गाने पैसा कमावता येईल का? याचा विचार बरेच जण करतात.

तसे पाहायला गेले तर अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. फक्त या पर्यायांचा योग्य पद्धतीने वापर करणे गरजेचे असते.

अशा उपलब्ध पर्यायांपैकी पर्याय म्हणजे तुमच्या घराचे छत किंवा टेरेस हे होय. असे काही व्यवसाय आहेत की जे तुम्ही तुमच्या घराच्या छताचा वापर करून करू शकतात व त्या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतात.

 घराच्या टेरेसचा पैसा कमावण्यासाठी असा करावा वापर

1- टेरेस फार्मिंग तुम्ही टेरेसवर भाज्या किंवा काही फळे सेंद्रिय पद्धतीने पिकवू शकतात व चांगल्या किमतींमध्ये ते विकू शकतात. टेरेस जास्त मोठ्या आकाराचे असेल तर तुम्ही जास्तीत जास्त सेंद्रिय पद्धतीने पिकांची लागवड करून या माध्यमातून उत्पादन घेऊन त्यांची विक्री करून चांगला पैसा मिळवू शकतात.

सध्या टेरेस फार्मिंग ही संकल्पना खूप पुढे येत असून जर बिहार सरकारचा विचार केला तर हे सरकार टेरेस फार्मिंग वर पन्नास हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर 50 टक्के सबसिडी देखील देत आहे. यावरून आपल्याला टेरेस फार्मिंगचे महत्त्व समजते.

टेरेस फार्मिंगमध्ये तुम्ही गाजर, टोमॅटो, मिरची आणि इतर अनेक भाजीपाला पिके वाढवू शकतात व विक्री करू शकतात. याबाबतचे काही तंत्रज्ञान असून त्याचे प्रशिक्षण घेऊन तुम्ही टेरेस फार्मिंगमध्ये चांगला पैसा मिळवू शकता.

2- सोलर पॅनल तुम्ही तुमच्या घराच्या टेरेसवर सोलर पॅनल लावून पैसे कमवू शकतात. या सोलर पॅनलच्या माध्यमातून तुमच्या घरासाठी तुम्ही मोफत वीज मिळवू शकता व विज बिलाच्या खर्चापासून वाचू शकतात. दुसरा फायदा बघितला तर या सोलर पॅनलच्या माध्यमातून तुमच्या वापरापेक्षा जास्त जी वीज तयार होते ती विकून चांगले उत्पन्न मिळवू शकतात.

समजा तुमच्या घराचे वीजबिल एक हजार रुपये आले तर तुम्ही एक किलोवॅट पर्यंत ऊर्जा निर्माण करणाऱ्या सेटअप मधून वीज निर्माण करून तुमचे हे विज बिल वाचवू शकतात

व यापेक्षा तयार होणारी अतिरिक्त वीज विकून तुम्ही प्रति युनिट पाच ते सहा रुपये या माध्यमातून कमाई करू शकतात. काही प्रसिद्ध मीडिया रिपोर्टच्या अहवालानुसार बघितले तर या मार्गाने तीस हजार ते एक लाख रुपयांपर्यंत पैसे कमावत आहेत.

3- मोबाईलचे टॉवर बसवणे तुम्ही तुमच्या घराच्या छतावर म्हणजेच टेरेसवर मोबाईल टॉवर उभारून चांगला पैसा मिळवू शकता. त्यामध्ये तुम्हाला काही मोबाईल कंपन्यांना जर मोबाईल टावर बसवण्यासाठी भाड्याने छत हवे असेल तर अशा कंपनीचा शोध घेऊन तुम्ही या माध्यमातून पैसा मिळवू शकता.

त्यासाठी तुम्हाला तुमच्या स्थानिक प्रशासनाकडून काही परवानग्या घेऊन टेरेसवर मोबाईल टॉवर उभारता येऊ शकते. यामध्ये मोबाईल कंपन्यांच्या माध्यमातून तुम्हाला मासिक स्वरूपामध्ये पैसे दिले जातात. अगदी छोट्या शहरांमध्ये देखील तुम्हाला या माध्यमातून महिन्याला साठ हजार रुपये पर्यंत कमाई करण्याची संधी उपलब्ध होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe