अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-औरंगाबाद रस्त्यावर हॉटेल इंद्रायणी जवळ औरंगाबाद रस्त्यावर सापडलेले मांडूळ पुन्हा निसर्गात मुक्त करण्यात आले. सागर गायकवाड, नीलेश गुंजाळ, अक्षय सातपुते यांना रस्त्यावर एक मांडूळ साप आलेला दिसला.
त्यांनी त्यास तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये आणले. एपीआय किरण सुरसे व पोलिस नाईक अविनाश वाघचौरे यांनी या बाबत वन विभागाचे फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील थेटे यांना कळवले त्यांनी याबाबत सर्प अभ्यासक व निसर्गमित्र मंदार साबळे यांच्याशी संपर्क साधला.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2020/05/Red_Sand_Boa_Eryx_johnii_by_Ashahar_alias_Krishna_Khan.jpg)
साबळे व नगर रेंजचे वनपरिक्षेत्र अधिकारी एन. बी. पोकळे, वनरक्षक सचिन शिंदेचालक युवराज तोडमल यांनी या ठिकाणी जाऊन या मांडुळाची पाहणी करून त्यास ताब्यात घेऊन पुन्हा निसर्गात मुक्त केले.
मांडूळ हा शेतात राहणारा प्राणी आहे. तो शेतकऱ्याच्या मित्र आहे. त्या बाबत समाजात अज्ञान असून अनेक गैरसमज पसरलेले असल्याने त्याची तस्करी केली जाते.
मात्र, हा प्रकार पूर्ण चुकीचा असल्याचे सर्प अभ्यासक मंदार साबळे यांनी सांगितले. तसेच या सापास दोन तोंडे असल्याचाही मोठा गैरसमज आढळतो.
मात्र, याचे शेपूट व तोंडाकडच्या भागाची निमुळती जाडी सारखी असते, तसेच त्याचे डोळे बारीक मोहरीसारखे असल्याने चटकन दिसत नाहीत.
त्यामुळे शांत बसलेले असल्यास तोंड व शेपूट यातील फरक कळत नाही. शेत जमिनीत चटकन घुसता यावे म्हणून त्याचे तोंड निमुळते असते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com