Health Tips:- चांगल्या आरोग्यासाठी जितका संतुलित आहार घेणे गरजेचे आहे व खाण्यापिण्याच्या सवयी वेळेत पाळणे गरजेचे आहे अगदी त्याचप्रमाणे जर एखादा आजार किंवा व्याधी असेल तर खाण्यापिण्याच्या बाबतीत काही काळजी घेणे देखील तितकेच गरजेचे असते.
त्यामुळे आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो व काही आजारांचे निदान होते. यावेळी डॉक्टरांकडून आपल्याला खाण्यापिण्याच्या बाबतीत पथ्य पाळायला सांगितले जाते. अगदी हीच बाब ज्या व्यक्तींना किडनी स्टोन आहे त्यांना देखील लागू होते.
जर किडनी स्टोनची समस्या असेल व ही समस्या तुम्हाला बरी होऊन पुन्हा होऊ नये असं वाटत असेल तर काय खावे आणि काय खाऊ नये याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे किडनी स्टोन असताना काय खावे आणि काय खाऊ नये? याबद्दलची माहिती या लेखात घेऊ.
किडनी स्टोनचा त्रास असेल तर काय खावे?
1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे किडनी स्टोन असेल तर तो थांबवण्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. दिवसातून कमीत कमी आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे.
2- जर किडनी स्टोन असेल व तो वाढू नये असे तुम्हाला वाटत असेल तर हाय फायबर असलेल्या पदार्थांचे जास्त सेवन करावे.
3- किडनी स्टोन पासून बचाव करण्यासाठी लिंबू, संत्री आणि मोसंबी सारखी सायट्रिक ऍसिड असलेल्या फळांचे सेवन करावे. कारण सायट्रिक ऍसिड मध्ये कॅल्शियम ऑक्स्झालेट जमा होण्यापासून थांबवण्याची क्षमता असते.
4- नारळाचे पाण्याचे सेवन करावे कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते किडनी स्टोनच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते.
5- त्यासोबतच तुम्ही हिरव्या भाजीपालांचा आहारामध्ये समावेश करून किडनी स्टोन ची समस्या दूर करू शकता.
6- तसेच बेलाची पाने, बेलफळ आणि बीट यासारखे फळे खाऊन देखील किडनी स्टोनच्या समस्येपासून तुम्ही बचाव करू शकतात.
7- तसेच लेटूस, कलिंगड तसेच आर्टिचोक्स आणि मटर यामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे यांचा आहारामध्ये समावेश करावा. व्यतिरिक्त उसाचा रस देखील किडनी स्टोन मध्ये फायदेशीर ठरतो.
किडनी स्टोन असल्यास काय खाऊ नये?
1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे किडनी स्टोन असेल तर तो वाढू नये याकरिता ऑक्जलेट आणि कॅल्शियम जास्त आहे असा आहार घेऊ नये.
2-टोमॅटो, सफरचंद आणि पालक सारखे हाय ऑक्जलेट असलेली फळे किंवा भाज्या खाऊ नये.
3- जर किडनी स्टोन झाला असेल तर नट्स खाणे देखील टाळावे. कारण यामुळे देखील किडनी स्टोन वाढू शकतो.
4- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मासे तसेच मांस, अंडी इत्यादी पदार्थ खाणे टाळावे तसेच दारूचे सेवन अजिबात करू नये.
5- दुधापासून तयार केलेले दही किंवा लोणी सारखे पदार्थ खाऊ नये. कारण यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते.
6- तसेच लसूण, कांदा, मुळा आणि गाजर सारख्या पदार्थांमध्ये सोडियम आणि ऑक्सालेट यांचे प्रमाण जास्त असते व त्यामुळे किडनी स्टोनची समस्या असेल तर हे पदार्थ खाऊ नये.