अहमदनगर – व्यायामाची आवड निर्माण होऊन संपुर्ण कुटूंबाचे आरोग्य निरोगी व स्वस्थ्य राहण्यासाठी नगर रायझिंग ग्रुपच्या वतीने रविवारी आयोजित करण्यात आलेल्या रन विथ फॅमिली या मिनी मॅरेथॉन स्पर्धेत नगरकर उत्सफुर्तपणे धावले.
उत्साह व जोशपुर्ण वातावरणात पार पडलेल्या या मॅरेथॉनमध्ये युवक-युवतींसह अबालवृध्द मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पहाटे 6 वाजल्यापासूनच बालिकाश्रम रोड येथील महालक्ष्मी उद्यानात बाळगोपालांसह संपुर्ण कुटूंबीय जमण्यास सुरुवात झाली.
जमलेल्या गर्दीने भल्या सकाळी उद्यान फुलून दिसत होते. प्रारंभी संगीताच्या तालावर व्यायाम करण्यात आले. राष्ट्रगीताने या स्पर्धेची सुरुवात झाली.
महालक्ष्मी उद्यान पासून सुरु झालेली ही मिनी मॅरेथॉन 3 व 5 कि.मी. या दोन गटात पार पडली. मोठ्या उत्साहाने सहभागी झालेल्या रनर्सनी वरील अंतर पार केले.
तसेच एक दिव्यांग युवकाने देखील या स्पर्धेत सहभाग नोंदवून उपस्थितांना प्रेरित केले. स्पर्धा पुर्ण करणार्या रनर्सना नगर रायझिंगच्या वतीने आकर्षक बॅच देऊन प्रोत्साहन देण्यात आले.
मॅरेथॉनला चालना देऊन, सदृढ आरोग्यासाठी नागरिकांमध्ये व्यायामाची आवड निर्माण होण्याच्या हेतून नगर रायझिंगच्या वतीने दर महिन्याला मिनी मॅरेथॉनचे आयोजन केले जात आहे.
या उपक्रमांतर्गत संपुर्ण कुटूंबीयांसाठी मॅरेथॉन ठेवण्यात आली होती. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नगर रायझिंगच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
- Infosys Share Price: इन्फोसिसच्या शेअरमध्ये मोठा चढउतार! गुंतवणूकदार गोंधळात… बघा सध्याची स्थिती
- SBI Share Price: एसबीआयच्या शेअरमध्ये मोठी पडझड! पटकन वाचा फायद्याची अपडेट, नाहीतर…
- Mobikwik Share Price: ई-कॉमर्स कंपनीच्या शेअरने 1 महिन्यात दिला 13.75% चा परतावा… आज बंपर तेजीत
- JK Tyres Share Price: जेके टायर्स शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या! किमतीत झाली मोठी वाढ…बघा ताजे अपडेट
- वोडाफोन- आयडिया शेअरच्या किंमतीत तेजीचे संकेत? BUY करावा का? बघा सध्याची ट्रेडिंग पोझिशन