Upcoming SUV Cars : पैसे तयार ठेवा…! येत्या आठवड्यात मार्केटमध्ये येत आहेत 3 नवीन SUV; लॉन्च होताच खरेदीसाठी होणार गर्दी !

Ahmednagarlive24 office
Published:
Upcoming SUV Cars

Upcoming SUV Cars : तुम्ही नजीकच्या भविष्यात जर नवीन SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. कारण येत्या 3 ते 4 आठवड्यांत महिंद्रा आणि जीप सारख्या मोठ्या कंपन्या ३ नवीन SUV लाँच करणार आहेत.

आगामी SUV चे बजेट वेगळे आहे. यामुळे त्याचे टार्गेट ऑडियंसही वेगळे आहेत. काही आगामी SUV लोकप्रिय कारच्या अद्ययावत आवृत्त्या आहेत. आगामी कारच्या यादीमध्ये महिंद्राच्या एकमेव सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या फेसलिफ्ट आवृत्तीचाही समावेश आहे. आगामी काळात कोणत्या SUV मार्केटमध्ये येतील पाहुयात…

Mahindra XUV 3X0

देशांतर्गत कार उत्पादक कंपनी महिंद्रा आपली एकमेव सब-कॉम्पॅक्ट SUV XUV300 ची फेसलिफ्ट आवृत्ती लॉन्च करणार आहे. 29 एप्रिल रोजी लॉन्च होणाऱ्या फेसलिफ्टेड XUV300 चे नवीन नाव XUV3X0 असेल. सध्याच्या कारच्या तुलनेत अद्ययावत एसयूव्हीमध्ये आधुनिक वैशिष्ट्ये देण्यात येणार आहेत. याशिवाय कारच्या बाह्य आणि आतील भागात मोठे बदल करण्यात येणार आहेत. आगामी महिंद्रा XUV300 मध्ये 10.25-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि पॅनोरॅमिक सनरूफ दिले जाऊ शकते.

Jeep Wrangler Facelift

अमेरिकन दिग्गज कपंनी जीप आपल्या लोकप्रिय एसयूव्ही रँगलरची फेसलिफ्ट आवृत्ती लॉन्च करणार आहे. ही SUV २२ एप्रिलला भारतात दाखल होणार आहे. आगामी SUV मधील पॉवरट्रेन 2.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे जे जास्तीत जास्त 270bhp पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे.

5-Door Force Gurkha

5-डोर फोर्स गुरखा येत्या काही आठवड्यांत मार्केटमध्ये दाखल होणार आहे. आगामी 5-डोर फोर्स गुरखा थेट महिंद्रा थारशी स्पर्धा करेल. आगामी SUV मध्ये पॉवरट्रेन म्हणून 2.6-लिटर 4-सिलेंडर डिझेल इंजिन दिले जाईल. आगामी SUV चे इंजिन जास्तीत जास्त 90bhp पॉवर आणि 200Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe