महाराष्ट्रात भाजपला मागील २०१४ व २०१९ प्रमाणे यश मिळवणं अवघड झालं आहे का? पहा एक ग्राऊंड रिपोर्ट

Ahmednagarlive24 office
Published:
MODI

महाराष्ट्रात सध्या अनेक गोष्टींमुळे व राजकीय उलथापालथ झाल्यामुळे येणाऱ्या लोकसभेला कोण बाजी मारतो, कोण बहुमत घेतो याच्या केवळ सध्या चर्चा सुरु आहेत. निवडणुकीवर अनेक गोष्टी परिणाम करणार आहेत. त्यातील एक महत्वाचा फॅक्टर म्हणजे पक्ष फोड.. कारण शिवसेना व राष्ट्रवादी हे दोन मोठे पक्ष फोडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे.

सध्या महाराष्ट्रात भाजपा आणि कॉंग्रेस यांच्या व्यतिरिक्त आता महाराष्ट्रात दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे व जोडीला वंचित बहुजन आघाडी असे पक्ष आहेत. त्यामुळे आता आगामी निवडणुकात नेमके काय होऊ शकते? कोण बहुमत घेऊ शकतो? सध्या भाजप महाराष्ट्रात ४५ प्लस जागा घेऊ असे म्हणत आहे. तर भाजपला खरोखर तितके यश मिळेल का? चला जाणून घेऊव्यात –

मतदारांचे नेमके काय म्हणणे?
सध्या काही चॅनेल, काही एजन्सीस ने सर्व्हे केला. त्या सर्व्हेतून मतदारांच्या काही भूमिका समोर आल्या. यातून असे दिसून आले की, महाराष्ट्रात गेल्या दोन-तीन वर्षात जो काही राजकीय गोंधळ झाला आहे ते पाहून सर्वसामान्य मतदार वैतागलेला आहे.

त्यांची मतदानासाठी जाण्याची इच्छाच नाही असेही दिसून आलं आहे. भ्रष्टाचार करणाऱ्यांना पक्षात कस घेतलं जातं? ज्यांना भ्रष्टाचारी भ्रष्टचारी म्हटले तेच नेते तिकडं मंत्री झाले. हे न कळण्याइतपत जनता वेडी नाही असेही काहींनी मत मांडले आहेत.  भ्रष्टाचारी नेते तिकडं गेले आणि सर्व मंत्री झाले. हे सर्व कसं घडतं, लोकांना सर्वकाही कळतं अशा प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत.

महाराष्ट्रातील सहानुभूतीचा फॅक्टर
महाराष्ट्राच्या राजकारणात सहानुभूती हा एक मोठा फॅक्टर आहे. अनेक निवडणुकांत या फॅक्टरने काम केलेले राज्याने पाहिले आहे. दरम्यान आता सध्या राष्ट्रवादी व शिवसेना हे पक्ष फुटल्याने महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ‘सहानुभूतीची लाट’ आहे असे म्हटले जातं आहे. पक्ष फोडाफोडीमुळे व ईडीच्या विविध कारवायांमुळे जनतेमध्ये नाराजी असल्याचा एक रिपोर्ट सांगतो. या फॅक्टरचा तोटा भाजप होऊ शकतो असे म्हटले जाते.

मराठा आरक्षण फॅक्टर
अंतरवाली सराटी येथे सुरु झालेले व त्यातंर महाराष्ट्र्भर व्यापून निघालेले मनोज-जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन. या आंदोलनामुळे व मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न मिळाल्यामुळे मराठा समाज नाराज असल्याचे बोलले जातं आहे.

सर्व्हेतील काही मराठा मतदार असे सांगतात की, बेरोजगारी आणि छोट्या शेतजमिनी असल्यानं उदरनिर्वाह करणे कठीण झाले असल्याने किमान आरक्षण भेटले तर मुलाबाळांना याचा फायदा होईल. वाढत्या महागाईमुळे मराठा समाजाला पूर्वीसारखे शेतीतून उत्पन्न मिळत नाही त्यामुळे आरक्षण गरजेचेच वाटते.

यातील काही मतदार यांना कोणाला मतदान करणार असं विचारल्यावर त्यांनी सांगितले की, मनोज जरांगे जे सांगतील तेच आम्ही करू व मतदान करू असे ते सांगतात. म्हणजेच हा देखील एक फॅक्टर या निवडणुकीत काम करेल असे दिसते.

पक्ष फुटीचे सर्वांपूढेच आवाहन
महाराष्ट्रात 48 लोकसभा जागांपैकी एका सर्व्हेनं भाजपाप्रणीत आघाडीला 41 हे तर दुसऱ्या एका सर्व्हेनं 37 जागा मिळतील असे वर्तवलेय. तर काही सर्वेनुसार हा आकडा अगदी 20 देखील दाखवला. या निवडणुकीत एकीकडे शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्यासमोर सर्वसामान्य नागरिकांमध्ये आपली बाजू मांडणे व सहानुभूतीचे मतात परिवर्तन करणे गरजेचे असल्याचे सांगितले जातं आहे.

तर दुसरीकडे मागील वेळी शिवसेनेची पूर्ण ताकद भाजपसोबत होती. ती आता विभागली गेली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मागे जर शिवसैनिक एकवटून उभा राहिला तर भाजपच्या मतांच्या टक्केवारीत घसरण होऊ शकते असेही एक मतप्रवाह आहे. तर काही लोक सांगतात की सुरूवातीला उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असणारी सहानुभुती कमी झाली

असून लोकांना मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे) चोवीस तास काम करत असल्याचं दिसू लागलं. लोकांना वाटतं आहे की ते काम करत असल्याचे दिसत असून काही निर्णय चांगले झाल्याने लोक त्यांच्या पाठीशी आहेत असाही एक मतप्रवाह आहे.

भाजपसमोर असणारी आवाहने
ग्रामीण भागात भाजपाबद्दल नाराजी दिसून येत असल्याचे चित्र आहे. बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या समस्या, शेतमालाचे भाव आदींमुळे नाराजगी आहे. तसेच पक्ष फोडणं चुकीचं असून ज्यांचा पक्ष होता त्यांच्याकडून तो हिसकावून घेण्यात आल्याची गोष्ट लोकांना खटकली आहे.

यात कळस म्हणजे पवार विरुद्ध पवार अशी देखील फाईट लावल्याने इथं स्वत:च्या ताकदीवर जिंकू शकत नाहीत त्यामुळे सर्वकाही सुरळीत असणाऱ्या तुम्ही इथं स्वत:च्या ताकदीवर जिंकू शकत नसल्याचेच तुमच्या लक्षात आल्याने फूट पाडण्यात आली असे लोक म्हणतात.

इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडीचा गैरवापर सुरु असल्याचे अनेक लोकांचे म्हणणे आहे. विश्लेषकांच्या मते अनेकांच्या मनात भाजपा हा पक्ष आणि कुटुंब तोडणारा पक्ष असल्याची जी प्रतिमा तयार झाली ते संपवण्याचे मोठे आवाहन भाजपासमोर आहे असे म्हटले जाते.

वंचित बहुजन आघाडीचा परिणाम
वंचित बहुजन आघाडीने आपले अनेक उमेदवार जाहीर केले आहेत. मागील वेळी जवळपास ७ टक्के मात्र त्यांनी घेतली होती. दरम्यान याचा फटका काँग्रेसला सर्वाधिक होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. जर वंचितने काँग्रेसला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली तर भाजपला याचा फटका बसू शकतो.

तात्पर्य
भाजपला महाराष्ट्रात 2019 सारखं यश मिळवणे सहज शक्य आहे का? या प्रश्नाला आता वरील काही बाबींचा विचहर करूनच उत्तर काढावे लागणार आहे. त्यामुळे येणारी निवडणूक वरील फॅक्टर लक्षात घेऊनच होणार असल्याने वाटते तितकी सोपी लढाई भाजपसह कोणत्याच पक्षाला आता ही राहिलेली नाही असे दिसते.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe