Upcoming Electric Cars : महिंद्रा या वर्षाच्या अखेरीस लॉन्च करत आहे दोन नवीन इलेक्ट्रिक कार, टाटाला देऊ शकते टक्कर…

Upcoming Electric Cars

Upcoming Electric Cars : जर तुम्ही नजीकच्या भविष्यात नवीन इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी तुमच्या कामाची आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय ग्राहकांमध्ये इलेक्ट्रिक कारच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. हे लक्षात घेता अनेक कंपन्यांनी आपले इलेक्ट्रिक वाहन बाजारात आणले आहे.

या सेगमेंट मध्ये सध्या टाटा मोटर्सचे वर्चस्व कायम आहे. भारतातील एकूण इलेक्ट्रिक कार विक्रीपैकी एकट्या टाटा मोटर्सचा वाटा ७० टक्क्यांहून अधिक आहे. या क्रमाने आता स्वदेशी कार उत्पादक कंपनी महिंद्रा 2024 मध्ये 2 नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. येत्या काही महिन्यांत लॉन्च होणाऱ्या महिंद्राच्या दोन्ही इलेक्ट्रिक कार्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

महिंद्रा XUV3X0

देशांतर्गत कार उत्पादक कंपनी महिंद्रा आपली एकमेव सब-कॉम्पॅक्ट SUV XUV300 ची फेसलिफ्ट आवृत्ती लॉन्च करणार आहे. 29 एप्रिल रोजी लॉन्च होणाऱ्या फेसलिफ्टेड XUV300 चे नवीन नाव XUV3X0 असेल. सध्याच्या कारच्या तुलनेत या एसयूव्हीमध्ये आधुनिक वैशिष्ट्ये देण्यात येणार आहेत. याशिवाय कारच्या बाह्य आणि आतील भागात मोठे बदल करण्यात येणार आहेत.

आगामी महिंद्रा XUV300 मध्ये 10.25-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि पॅनोरॅमिक सनरूफ असू शकतो. तसेच आगामी इलेक्ट्रिक कारमध्ये 35 kWh बॅटरी दिली जाईल जी ग्राहकांना एका चार्जवर 300 किलोमीटरहून अधिकची रेंज देईल.

MahindraXUV.e8

कंपनी INGLO प्लॅटफॉर्मवर आधारित Mahindra XUV.e8 या वर्षाच्या अखेरीस लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही इलेक्ट्रिक कार 80 kWh क्षमतेच्या बॅटरी पॅकसह सुसज्ज असेल जी 227-345 किमीची रेंज देईल. महिंद्राची आगामी इलेक्ट्रिक कार XUV.e8 चाचणी दरम्यान अनेक वेळा पाहिली गेली आहे. या कारमध्ये ग्राहकांना अनेक उत्तम फीचर्स मिळणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe