लोकसभेच्या अनुशंघाने आता सर्वच पक्षांची पळापळ सुरु आहे. प्रत्येकानेच कम्बर कसली आहे. भाजपने देशात 400 प्लसचा नारा दिला आहे. महाराष्ट्रात जर विचार केला तर पक्षांची रसमिसळ झाली आहे. महायुती मध्ये तीन पक्ष व महाविकास आघाडीत तीन पक्ष असे विरोधक आहेत.
महाराष्ट्रात महायुती 45 प्लसचा नारा देत आहे. तर इंडिया प्रणित महाविकास आघाडी देखील आम्हीच पुढे राहू असे सांगत कम्बर कसत आहे. दरम्यान आता निवडणूक सुरु होतील. त्याआधीच पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी जो एक सर्व्हे करण्यात आला त्यात महाराष्ट्रातील 48 लोकसभा जागांचा धक्कादायक अहवाल आला आहे.
या ओपिनियन पोलमध्ये एनडीएला 28 जागा मिळतील यात 25 जागा भाजपला तर तीन जागा शिवसेनेला (शिंदे गट) मिळतील असे म्हटले आहे. म्हणजेच हा भाजपला धक्का असेल कारण भाजप महाराष्ट्रात 45 प्लस चा नारा देत आहे.
I.N.D.I.A. आघाडीचा विचार केला तर या पोलमध्ये त्यांना 20 जागा मिळतील असे दिसते. या वीस पैकी 10 जागा शिवसेनेला (ठाकरे गट) मिळतील असे म्हटले आहे.
सर्व्हेनुसार कुणाला किती जागा मिळतील?
या सर्व्हेनुसार भाजपला 25 जागा, काँग्रेसला 05 जागा, शिवसेनाला (शिंदे गट) 03 जागा, एनसीपी(अजित गट)ला 00 जागा, शिवसेना(उद्धव गट)ला 10 जागा, एनसीपी(शरद पवार गट)ला 05 जागा मिळतील असा अंदाज आहे.
कुणी व कशा पद्धतीने झाला हा सर्व्हे ?
हा सर्व्हे टीव्ही 9, पीपल्स इनसाइट पोलस्ट्रॅट यांनी केलाय. या सर्व्हेमध्ये जवळपास 25 लाख लोकांनी सहभाग घेतलेला असून या सर्व्हेत लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या प्रत्येक विधानसभा मदार संघातून सॅम्पल घेण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. 1 एप्रिल ते 13 एप्रिल पर्यंत हा सर्व्हे केला गेला असून त्याचा निकाल आला आहे.