Business Idea: महाराष्ट्रात ‘हे’ उद्योग सुरू करायला आहे मोठी संधी! कराल सुरुवात तर कमवाल लाखोत

Ajay Patil
Published:
business idea

Business Idea:- एखादा उद्योग सुरू करायचा असेल तर त्यासाठी संबंधित उद्योगासाठी असलेली सरकारची पूरक धोरणे, त्या उद्योगासाठी आवश्यक असणारा कच्चामालाची उपलब्धता, बाजारपेठेपर्यंत वाहतुकीच्या सोयी, संबंधित व्यवसाय किंवा उद्योगातून तयार होणाऱ्या पक्कामालासाठी आवश्यक बाजारपेठ इत्यादी गोष्टी ज्या ठिकाणी एकत्रितपणे असतात अशा ठिकाणी उद्योग उभे राहत असतात.

त्यामुळे देशातील काही राज्यांमध्ये उद्योगांचे एकत्रीकरण झालेले आपल्याला दिसून येते. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून बघितले तर महाराष्ट्र हे प्रगत राज्य असून या ठिकाणी अनेक उद्योगांना चांगला वाव आहे

महाराष्ट्र हे औद्योगिक आणि कृषी क्षेत्राच्या दृष्टिकोनातून देखील मोठ्या प्रमाणावर प्रगती करत असताना त्या अनुषंगाने व्यवसायांची उभारणी महाराष्ट्रामध्ये खूप फायद्याची ठरू शकते. त्यामुळे या लेखामध्ये महाराष्ट्रात असे कोणते उद्योग आहेत की त्यांना चांगली संधी आहे. याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत.

 महाराष्ट्रात मोठी संधी असलेले उद्योग व्यवसाय

1- सर्जिकल कॉटन महाराष्ट्रामध्ये कृषी क्षेत्राचा विकास होत असताना कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. कापसावर प्रक्रिया करून सर्जिकल कॉटन बनवला जातो. आपल्याला माहित असेलच की या सर्जिकल कॉटन चा वापर हा नर्सिंग होम, हॉस्पिटल तसेच ब्युटी पार्लरमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो.

त्यामुळे शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करून त्यावर प्रक्रिया करून सर्जिकल कॉटन व्यवसाय सुरू करू शकता. या व्यवसायामध्ये कापसावर प्रक्रिया करताना प्रामुख्याने ब्लिचिंग, ड्रॉइंग, लॅपिंग, रोलिंग, कटिंग आणि पॅकिंग इत्यादी गोष्टींचा अंतर्भाव होतो. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जागा आणि भांडवल म्हणून 25 ते 30 लाख रुपये लागतात.

2- कपड्यांचा व्यवसाय महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक आपल्याला राहतांना दिसून येतात. तसेच आता मोठ्या प्रमाणावर वेस्टर्न आणि इंडियन कल्चरचे कॉम्बिनेशन देखील आपल्याला दिसते. त्यामुळे कपडे खरेदी कडे सध्या लोकांचा कल मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.

महाराष्ट्र मध्ये प्रामुख्याने भिवंडी तसेच उल्हासनगर, मालेगाव आणि सोलापूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर टेक्स्टाईल उद्योग असून या ठिकाणाहून तुम्ही थेटपणे मालाची खरेदी करून विक्री व्यवसाय सुरू करू शकतात. या माध्यमातून तुम्ही होलसेल तसेच रिटेल, ट्रॅडिशनल म्हणजेच परंपरागत कपड्यांचे दुकान सुरू करण्याचा विचार हा व्यवसाय सुरू करू शकतो.

3- व्हेजिटेबल डीहायड्रेशन महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणावर भाजीपाला व फळांचे उत्पादन घेतले जाते. परंतु बऱ्याचदा घसरलेल्या दरांमुळे शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला किंवा फळे आहे त्या भावामध्ये विकावा लागतो. कारण भाजीपाला आणि फळे जास्त दिवस टिकत नाही. या अनुषंगाने जर भाजीपाला वाया घालवण्यापेक्षा त्यावर प्रक्रिया केली तर एक नवीन व्यवसाय या माध्यमातून उभा राहणे शक्य आहे.

या उद्योगांमध्ये व्हेजिटेबल डेहायड्रेशन उद्योग सुरू करता येऊ शकतो. या उद्योगात भाज्या आणि फळे सुकवून त्यांची दीर्घकाळ टिकेल आणि स्वयंपाकात त्यांचा वापर करता येईल अशा पद्धतीने पावडरी तयार केल्या जातात. एक लाख रुपये गुंतवणूक करून तुम्ही हा व्यवसाय महाराष्ट्रात सुरू करू शकतात.

4- मसाला उद्योग मसाला भारतीय खाद्य संस्कृती मधील एक प्रमुख घटक असून मसाल्यांशिवाय भारतीय स्वयंपाक पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये मसाल्यांना खूप मोठ्या प्रमाणावर मागणी असते. तुम्ही देखील मसाला उद्योग घरगुती स्तरावर देखील सुरू करू शकतात.

5- पोहा मॅन्युफॅक्चरिंग युनिट पोहे म्हटले म्हणजे भारतीयांना खाद्य पदार्थांमध्ये नाश्ता म्हणून पोह्याला खूप मोठे महत्त्व आहे. अवघ्या तीन ते चार कामगार सोबत घेऊन तुम्ही हा व्यवसाय उभा करू शकतात. पोहे निर्मितीसाठी साळ हा कच्चामाल लागतो व चांगली पोसलेली व स्वच्छ केलेली साळ खरेदी करून हा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता.

तसेच यासोबत 1000 चौरस फूट जागा यासाठी लागते. तुम्हाला जर एकदम छोटे स्तरावर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याकरिता रोस्टर, भट्टी तसेच पोह्याचे यंत्र, चाळण्या तसेच वजन काटा आणि मोठ्या स्तरावर व्यवसाय सुरू करायचा असेल तर ग्रेडर, रोस्टर, डिस्टोनर, फ्लेकर, पोहा मिल, ग्रेडिंग मशीन आणि पॅकेजिंग मशीन यासारखे यंत्रसामग्री लागते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe