उन्हाळ्यामध्ये तुमचा फोन खूप जास्त गरम होत आहे का? होऊ शकतो बॅटरीचा स्फोट? ‘या’ टिप्स वापरा आणि फोनचे रक्षण करा

Published on -

सध्या सगळीकडे प्रचंड प्रमाणात उष्णता असून राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पारा जवळपास 42 अंशाच्या पुढे आहे. तसेच येणाऱ्या काही दिवसात राज्यासह भारतामध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे अंगाची लाही लाही करणाऱ्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाल्याची स्थिती आहे.

या सगळ्या उष्णतेच्या कालावधीमध्ये घरातील अनेक विद्युत उपकरणांची काळजी घेणेदेखील तितकेच गरजेचे असते. परंतु त्यासोबतच आपण वापरत असलेला स्मार्टफोन देखील उष्णतेला खूप संवेदनशील असल्यामुळे आपण या कालावधीत पाहतो की फोन जास्त प्रमाणामध्ये गरम होताना आपल्याला दिसून येतो.

अशामुळे जर फोन गरम झाला तर बॅटरी फुटून अपघात होण्याची देखील शक्यता वाढते. त्यामुळे उन्हाळ्याच्या कालावधीत मोबाईलची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. या कालावधीत फोन ओव्हर हिट होतो व त्यामुळे फोन स्लो काम करायला लागतो व बॅटरी लिकेजची समस्या देखील पुढे येते.

 या टिप्स वापरा आणि उष्णतेपासून फोनचे रक्षण करा

1- फोन रिस्टार्ट करणे उन्हाळ्यामध्ये जर फोन जास्त प्रमाणामध्ये हिट झाला आहे असे वाटत असेल तर थोडा वेळ पर्यंत त्याचा वापर बंद करणे फायद्याचे ठरते. तसेच त्यासोबत रिस्टार्ट केला तरी देखील फायदा मिळतो. आपल्यापैकी बऱ्याच जणांना फोनला कव्हर लावण्याची सवय असते. परंतु या कालावधीत फोनचे कव्हर काढून टाकणे गरजेचे आहे.

2- एरोप्लेन मोडचा वापर बऱ्याचदा फोन मध्ये जास्त ॲप असतात त्यामुळे फोनचे बॅकग्राऊंड क्लिअर करणे गरजेचे आहे. बराच वेळ फोनवर गेम खेळणे तसेच फोन करणे, बॅकग्राऊंडला एकापेक्षा जास्त एप्लीकेशन असल्यास मोबाईल स्लो होतो. त्यामुळे मोबाईल खूप लवकर गरम होतो व त्यामुळे शक्य झाल्यास तो एरोप्लेन मोडवर ठेवावा.

3- उन्हाळ्यात कारमध्ये फोन ठेवू नये बऱ्याचदा कित्येक जणांना सवय असते की कुठे बाहेर गेले की कार उन्हातच पार्क केली जाते व कुठे कामासाठी जाताना कारमध्येच मोबाईल ठेवला जातो. त्यावेळी जर तुम्ही उन्हामध्ये कार पार्क केली असेल तर कार मधील तापमान वाढू शकते व कारमध्ये जर मोबाईल अशावेळी मोबाईल ठेवला तर त्याचे देखील तापमान वाढून फोन हिट होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही गाडी जर उन्हात पार्क करत असाल तर चुकून देखील मोबाईल कार मध्ये ठेवू नये.

4- फोन चार्ज करताना घ्यावी काळजी मोबाईल जर चार्जिंगला लावायचा असेल तर त्याला उशी किंवा ब्लॅंकेट खाली किंवा फोनच्या खाली ब्लँकेट किंवा उशी ठेवू नये. असे केले तर फोन जास्त गरम होण्याची शक्यता वाढते. तसेच या कालावधीत तुम्हाला फोन चार्ज करण्यासाठी ज्या जागेवर ठेवायचा आहे ती जागा चांगली थंडी आहे का याची खात्री करूनच त्या ठिकाणी फोन चार्ज लावावा.

5- फोनचे बॅकग्राऊंड आपण जेव्हा उन्हामध्ये फोनचा वापर करतो तेव्हा फोनचे  बॅकग्राऊंड खूप जास्त हाय करतो म्हणजेच त्याचा ब्राईटनेस वाढवतो. यामुळे देखील फोन जास्त प्रमाणामध्ये गरम होतो. त्यामुळे फोनचे स्क्रीन बॅकग्राऊंड लो करून ठेवणे गरजेचे आहे.

6- उन्हाळ्यामध्ये फोन खिशात ठेवणे टाळावे उन्हामध्ये जर तुम्ही कुठे बाहेर जात असाल तर फोन खिशामध्ये ठेवू नये. आपल्या शरीरातील उष्णता आणि बाहेरील कडक उन्हाळा त्यामुळे फोन जास्त प्रमाणामध्ये तापू शकतो. अशा परिस्थितीमध्ये एकतर फोन बॅगेमध्ये ठेवावा किंवा शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करावा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe