शिर्डी राजकारणात खळबळ उडवणाऱ्या उत्कर्षा रुपवते कोण आहेत? आजोबा होते कॅबिनेटमंत्री, डॉ. आंबेडकरांशी खास कनेक्शन, वडिलांचीही राजकीय पार्श्वभूमी, पहा..

Ahmednagarlive24 office
Published:
utkrsha rupvate

अहमदनगरच्या राजकारणात आता मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. शिर्डीमध्ये राजकीय उलथापालथ होण्याचे संकेत मिळत आहेत.

याचे कारण म्हणजे काँग्रेसशी एकनिष्ठ असणारे रुपवते कुटुंबातील उत्कर्षा रुपवते यांनी ऐन लोकसभेच्या निवडणुकांआधी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. त्यांना काँग्रेसकडून येथे तिकीट न मिळाल्याने त्या वंचितमध्ये गेल्या.

आता रुपवते यांना वंचितने येथे तिकीट दिले तर यामुळे महाविकास आघाडी व महायुती दोघांनाही मोठी डोकेदुखी होणार आहे. या उत्कर्षा रुपवते कोण आहेत? त्यांची कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी काय आहे ते आपण पाहुयात…

मोठी कौटुंबिक पार्श्वभूमी
दादासाहेब रूपवते हे उत्कर्षा यांचे आजोबा आहेत. तसेच स्वर्गीय प्रेमानंद रूपवते यांच्या त्या मुलगी आहेत. रूपवते परिवार काँग्रेस निष्ठावान समजला जातो. यंदा शिर्डी मतदारसंघातून कॉंग्रेसच्या वतीने निवडणूक लढण्यासाठी त्यांची तयारी होती.

पण मविआमध्ये शिवसेना ठाकरे गटाला ही जागा मिळाल्याने त्या नाराज होत्या. त्यांचे आजोबा दादासाहेब रुपवते हे राजकारणी, आंबेडकरवादी सामाजिक कार्यकर्ते होते. सन्माननीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ते सहकारी आणि अनुयायी होते. दादासाहेब रुपवते हे 1968 ते 1978 या कालावधीत ते आमदार राहिले आहेत त्यांनी 1972 ते 1975 आणि 1977 ते 1978 या कालावधीत दोन वेळा महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री ते राहिले आहेत.

त्यांनी समाज कल्याण, गृहनिर्माण, सांस्कृतिक, मत्स्यव्यवसाय, झोपडपट्टी विकास हे खाते संभाळलली आहेत. त्यांनी संपाद्क म्हणूनही काम पहिले आहे. अहमदनगरमधील दादासाहेब रुपवते विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय यालाही त्यांचेच नाव आहे.

दादासाहेब यांचा मुलगा अर्थात प्रेमानंद रुपवते हे देखील सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणी होते. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांच्या 5 दशकांच्या सक्रिय कार्यात त्यांनी अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या. उत्कर्षा या त्यांच्या मुलगी आहेत.

दिग्गजांच्या पोटात गोळा
लोकसभा निवडणूक घोषित झाल्यापासूनच आंबेडकरी चळवळीतील नेते व पदाधिकाऱ्यांनी बौद्ध समाजातील उमेदवार देण्याची प्रमुख पक्षांकडे मागणी केली होती. २००९ नंतर प्रमुख पक्षांकडून बौद्ध समाजावर सातत्याने अन्याय होत असल्याची खंत त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आली,

आता उत्कर्षा रूपवते यांना वंचित ‘कडून उमेदवारी मिळाल्यास बौद्ध समाजाच्या नेत्यांची व मतदारांची साथ त्यांना मिळणार का? हे पाहणे औचुक्याचे ठरणार आहे. तसेच रूपवते यांच्या रुपाने ‘वंचित’ला तगडा उमेदवार मिळाल्याने दिग्गजांच्या पोटात गोळा उठणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe