WHO ने थांबवलं तरी भारतात हायड्रोक्सिक्लोरोक्वीनचा वापर; जाणून घ्या..

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :-कोरोनाच्या विरोधात अनेक तज्ज्ञ लढत आहेत. परंतु त्यांना अजूनही लस शोधण्यास म्हणावे असे यश आलेले नाही. हायड्रोक्सिक्लोरोक्वीनचा मध्यंतरी वापर करण्याचा प्रयत्न केले गेला.

परंतु या औषधाचे कोरोना रुग्णांवर होणारे दुष्परिणाम पाहता जागतिक आरोग्य संघटनेनं या औषधाचं ट्रायल थांबवण्याचा निर्णय घेतला.

मात्र तरीही इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने आरोग्य कर्मचाऱ्यांवर या औषधाचा प्रयोग सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोविड-19 ला रोखण्यात हे औषध प्रभावी ठरेल असा विचार केला आणि त्याबाबत केला अभ्यासाचा परिणाम पाहता आम्ही वैद्यकीय देखरेखीत अनुभवी तज्ज्ञांकडून या औषधाचा प्रयोग करू शकतो, असं ICMR ने केंद्र सरकारला सांगितलं.

आयसीएमआरचे डायरेक्टर जनरल डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितलं की, या औषधाच्या प्रयोगापूर्वी एक परीक्षण केले त्यात अँटिव्हायरल गुण दिसून आले.

याच्या वापरानंतर भीती, उलटी याशिवाय इतर गंभीर असे दुष्परिणाम दिसून आले नाहीत. हे औषध कोरोनाविरोधात काम करू शकतं. त्यामुळे या औषधाचा प्रयोग रोगप्रतिरोधक म्हणून सुरूच राहिलं असं आम्ही स्पष्ट केलं आहे.

त्यानंतर आता या औषधाचा प्रयोग भारतात सुरूच ठेवला जाणार आहे. मात्र त्याच्या वापराबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना मंगळवारी निर्देश जारी केले आहे.

एचसीक्यूची उपलब्धता आणि विक्रीबाबत अपडेटेड माहिती केंद्राला देण्याच्या सूचना आरोग्य मंत्रालयाने केल्या आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment