अर्ज भरताना सुजय विखेंची भव्य रॅली, कट्टर राजकीय विरोधक एकत्र आले अन कार्यकर्ते खांद्यावर घेऊन नाचले ! विखेंचा ‘पॅटर्न’च वेगळा

Ahmednagarlive24 office
Published:
vikhe jagatap

अहमदनगर दक्षिण अर्थात अहमदनगर लोकसभा मतदार संघ हा राजकीय वैशिष्ट्यांची रेलचेल. कधी कोण कुणाच्या विरोधात तर कोण कधी मित्र होईल हे सांगता येणे कठीण. याची झलक या लोकसभेच्या निवडणुकांच्यावेळी दिसून येत आहे. खा. सुजय विखे व निलेश लंके यांच्यात ही फाईट रंगली आहे.

दरम्यान आज (२२ एप्रिल) खा. सुजय विखे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तो दाखल करण्यापूर्वी त्यांनी नगर शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. जोरदार शक्तीप्रदर्शन विखे यांनी यामाध्यमातून केले.

या रॅलीमध्ये एकेकाळचे दोन राजकीय विरोधक अर्थात खा. सुजय विखे व आ. संग्राम जगताप एकाच रॅलीत दिसले. कार्यकर्त्यांनी देखील जल्लोष करत त्यांना खांद्यावर घेतले.

विखे-जगताप एकेकाळचे राजकीय विरोधक
खा. सुजय विखे व आ. संग्राम जगताप हे एकेकाळचे कट्टर राजकीय विरोधक. मागील वेळी दोघे एकमेकांच्या विरोधात उभे होते. एकमेकांच्या विरोधात त्यांनी प्रचार केला. यावेळी महायुती असल्याने दोघेही एकत्रच प्रचार करताना दिसत आहेत.

छत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅली
खा. सुजय विखे यांच्या रॅलीला माळीवाडा बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून सुरुवात झाली. ही रॅली माळीवाडा ते नवी पेठ मार्गे दिल्ली गेटपर्यंत जाईल. व तेथे छोटेखाणी सभा होईल.

विखे यांना विजयाची खात्री
सभेनंतर सुजय विखे अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात जातील आपला उमेदवारी अर्ज भरतील. सुजय विखे हे मागील वेळी बहुमताने विजयी झाले होते. आता ते दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून जोरदार तयारी केली आहे.

नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी जनता आपल्यालाच मतदान करणार असून त्यामुळे आपल्याला विजयाची खात्री आहे असा विश्वास सुजय विखेंनी व्यक्त केलाय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe