महाराष्ट्रात २ जूनला बरसणार मान्सूनपूर्व पाऊस

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :-हवामान खात्याने बळीराजाची सुखद बातमी दिली आहे.१ किंवा २ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

त्याचप्रमाणे यंदा राज्यात मान्सून सरासरीपेक्षा अधिक बरसणार आहे. सध्या महाराष्ट्र उष्णतेच्या लाटांनी होरपळून निघाला आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ येथील कमाल तापमानाने ४५ अंशांचा आकडा गाठल्याने नागरिकांसाठी हे वातावरण तापदायक बनले आहे.

हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, १ ते २ जूनला मान्सूनपूर्व पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात कोसळण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात सर्वसामान्य तर विदर्भात सामान्यापेक्षा कमी पाऊस होईल. सर्वसाधारणपणे महाराष्ट्रात ११ जून रोजी पाऊस येईल. नेहमीपेक्षा जास्त रेंगाळून ८ आॅक्टोबर रोजी त्याच्या परतीचा प्रवास सुरू होईल. असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुंबईत आकाश राहणार ढगाळ.

२७ आणि २८ मे रोजी मुंबई व आसपासच्या परिसरातील आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसच्या आसपास असेल.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment