पावसाळा सुरु होण्यापूर्वी सर्व शेतकऱ्यांची कापूस खरेदी करा

Ahmednagarlive24
Published:

वर्धा : आणीबाणीच्या  काळात शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण शासन अवलंबित असून लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचा बराच कापूस शिल्लक राहिलेला आहे.

हा सर्व कापूस पावसाळा सुरु होण्यापुर्वी विक्री होणे आवश्यक आहे. यासाठी कापूस खरेदी केंद्राने रोज किमान १०० शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करावा.

पणन महासंघाने ग्रेडर उपलब्धता वाढवून संकलन केंद्रावर असलेल्या कापूस गाठी व सरकीची उचल करावी, अशा सूचना पालकमंत्री सुनील केदार यांनी दिल्या.

पालकमंत्री सुनील केदार यांनी ४६ अंश तापमानात जिल्ह्यातील १४ जिनींग व  प्रेसिंगला भेट दिली. संकलन केंद्रावर कापूस खरेदीसाठी जिनिंगला असलेल्या समस्या, बाजार समितीच्या सचिव पणन महासंघाचे ग्रेडर व जिनिंगच्या संचालकांसोबत चर्चा करुन समस्या जाणून घेतल्या.

यावेळी सेलू येथील गोल्ड फायबर जिनिंग  येथे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, तहसीलदार महेंद्र सोनवने, जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे, गोल्ड फायबर जिंनिंगचे संचालन श्री.सिंघनिया उपस्थित  होते.

तर हिंगणघाट येथे  अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, आमदार समीर कुणावार, सुधीर कोठारी, माजी आमदार राजु तिंमाडे, देवळे येथे आमदार रणजित कांबळे यांची उपस्थिती होती.

कापूस खरेदी केद्रावर खरेदी केलेल्या कापसाची प्रोसेसिंग करुन गाठी बनविण्यात येतात. मात्र गाठी व सरकीची उचल पणन महामंडळाद्वारे होत नसल्याच्या समस्या जिनिंग संचालकांनी मांडल्यात.

यावर सीसीआयकडे गोडाऊनची उपलब्धता कमी असल्यामुळे कापूस मालाची उचल कमी होत आहे असे सीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर श्री.केदार यांनी जिल्हाधिकारी यांना गोडाऊन उपलब्ध करुन देण्याच्या सूचना यावेळी दिल्या.

कापूस संकलन केंद्रावर दररोज किमान १०० शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी झाली तरच पावसाळ्यापूर्वी सर्व शेतकऱ्यांचा कापूस खरेदी होऊ शकतो. सीसीआयकडे आवश्यक ग्रेडर कमी असल्यामुळे बाजार समित्यांनी त्यांच्याकडचे ग्रेडर तसेच आवश्यक मनुष्यबळ सीसीआयला पुरवावे.

शासकीय शनिवार या सुट्टीच्या दिवशी सुद्धा शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी सुरु ठेवावी. जिल्ह्यातील एकही शेतकरी कापूस विक्री पासुन वंचित राहू नये यासाठी बाजार समितीत्यांनी सीसीआयसोबत समन्वय साधून काम करावे, अशा सूचना श्री.केदार यांनी दिल्या.

यावेळी हिंगणघाट येथील उपविभागीय अधिकारी यांना सर्व नगर पालिकांना सूचना देऊन नगर पालिकांच्या फायर ब्रिगेड गाड्या कर्मचारी वर्गासहित तत्पर ठेवण्यास सांगितले.

जिल्ह्यात ११ कापूस खरेदी केंद्र सुरु असून तीन केंद्र नव्याने सुरु करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर येत्या दोन दिवसात आणखी ३ कापूस खरेदी केंद्र सुरु होणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक श्री.वालदे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील गोल्ड फायबर जिनिंग, वासुदेव जिनींग सिंदी रेल्वे, समुद्रपूर तालुक्यातील श्रीकृष्ण जिनींग व प्रेसिंग घोडगाव,

हिंगणघाट तालुक्यातील साईकृपा ऍग्रो प्रोसेसर्स, जे.आर. टेक्सटाईल, धनराज कॉटेक्स, देवळी तालुक्यातील संस्कार ॲग्रोप्रोसेर्सस वायगाव, संत गजानन जिनींग, श्रीकृष्ण जिनींग, जय बजरंग  जिनींग प्रेसिंग,

जय बजरंग जिनींग, संत गजानन माऊली जिनींग  ॲन्ड प्रेसिंग पुलगाव, आर्वी तालुक्यातील रामकृपा फायबर्स खरांगणा, एम.आर. जिनींग तळेगाव, एमडीव्हीएस असोसिएट या जिनिंगला भेट देऊन समस्या जाणून घेतल्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment