बऱ्याचदा आपण एखाद्या सरकारी कामांसाठी किंवा योजनांचा लाभ घेण्यासाठी संबंधित कार्यालयामध्ये जातो. कार्यालयामध्ये गेल्यानंतर आपल्याला अनेक प्रकारची कागदपत्रे आवश्यक असतात व अशी कागदपत्रे आपल्याला एखादी सरकारी योजना किंवा सरकारी कामे किंवा एखादे कागदपत्र काढायचे असेल तर त्यासाठी व्हेरिफिकेशन करिता लागतात.
परंतु बऱ्याचदा अशी कागदपत्रे चुकून आपल्याकडून घरी राहतात किंवा ते गहाळ झालेले असतात व वेळेला खूप धावपळ होते. त्यामुळे एखाद्या वेळेस खूप मोठे नुकसान होण्याची शक्यता उद्भवते. तसेच अनेक सरकारी कामे असतात ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला संबंधित कार्यालयात जावे लागते.
या सगळ्या परिस्थितीमध्ये वेळ तर जातोच परंतु बऱ्याचदा पैसा देखील खर्च होतो. त्यामुळे तुम्हाला जर या सगळ्या कटकटी पासून मुक्तता हवी असेल म्हणजेच सरकारी योजनाची माहिती तुम्हाला हवी असेल किंवा सरकारी कामे किंवा कोठे सरकारी कागदपत्राद्वारे व्हेरिफिकेशनची आवश्यकता असेल तर तुमच्यासाठी काही मोबाईल ॲप्लिकेशन खूप फायद्याचे ठरू शकतात.
हे मोबाईल ॲप्लिकेशन अनेक सरकारी सेवांबद्दल तुम्हाला अपडेट देत राहतात. त्यामुळे महत्त्वाची व फायद्याचे असणारे असे एप्लीकेशन मोबाईलमध्ये असणे खूप गरजेचे आहे. त्याबद्दलचीच माहिती आपण या लेखात घेऊ.
हे तीन एप्लीकेशन ठरतील फायद्याची
1- डीजीलॉकर ॲप– डिजीलॉकर हा डिजिटल इंडिया उपक्रमाचा एक भाग असून इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाचा एक प्रमुख उपक्रम आहे. बरेच महत्त्वाचे कागदपत्रे सुरक्षित ठेवता यावी त्याकरिता हे एप्लीकेशन तयार करण्यात आलेले आहे. या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही पॅन कार्ड,
आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स सुरक्षित ठेवू शकतात. हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईल मध्ये असेल तर तुम्हाला कागदपत्रांची हार्ड कॉपी सोबत बाळगण्याची गरज राहत नाही. यामध्ये तुम्हाला बरेच कागदपत्रे ठेवता येऊ शकतात व अशाप्रकारे हे ॲप्लिकेशन फायद्याचे ठरते.
2- एम–आधार ॲप– आपल्याला माहित आहे की आधार कार्ड हे अतिशय महत्त्वाचे कागदपत्र असून तुम्हाला बऱ्याच कामांसाठी आधार कार्डची आवश्यकता भासते. अगदी बँकेपासून तर सरकारी कार्यालयांमध्ये, अगदी सिम कार्ड घेण्यासाठी देखील तुम्हाला आधार कार्डची गरज भासते.
अशाप्रसंगी अनेक प्रकरणांमध्ये एम आधार वैध आहे. एप्लीकेशनच्या मदतीने वापरकर्ते आधार कार्डची डिजिटल कॉपी मिळवू शकतात आणि ती सेव करू शकतात. एम आधार ॲपच्या मदतीने तुम्हाला आधार अपडेट देखील करता येते व हे ॲप्लिकेशन अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे.
3- उमंग अॅप– उमंग अॅप हे अतिशय महत्त्वाचे ॲप असून तुम्हाला पीएफ बॅलन्स तपासण्यापासून, पॅन कार्डसाठी अर्ज करण्यापर्यंतची कामे या माध्यमातून करता येतात.
एवढेच नाही तर तुम्ही उमंग अँप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही विज व पाण्याची बिले जमा करणे तसेच गॅसची बुकिंग करणे या व इतर बाराशे हुन अधिक सरकारी सुविधांचा लाभ घेऊ शकतात. हे ॲप्लिकेशन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2017 मध्ये लॉन्च केले होते.