Weight Loss Tips:- सध्या प्रत्येकाचे जीवन हे अत्यंत धावपळीचे आणि व्यस्त झाल्यामुळे व्यक्तीला त्याच्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही अशी परिस्थिती दिसून येते. व्यस्त जीवनशैलीमुळे झोप तसेच जेवणाचे बिघडलेले वेळापत्रक, बाहेरील जंक फूडचे मोठ्या प्रमाणात सेवन इत्यादी अनेक गोष्टींमुळे वजन वाढणे, हृदयरोग व उच्च रक्तदाबा सारख्या अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या असून यातील वाढत्या वजनाच्या समस्याने अनेक जण हैराण आहेत.
त्यामुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतात. डाइट, एक्सरसाइज तसेच इतर अनेक पर्याय अवलंबले जातात. परंतु वजन काही कमी होण्याचे नाव घेत नाही. बरेच जण वर्कआउट वर भर देतात.
परंतु वर्कआउट सोबतच तुम्ही तुमच्या आहारावर लक्ष देणे देखील तितकेच गरजेचे असते. यामध्ये सकाळचा नाश्ता खूप महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो. त्यामुळे या लेखात आपण सकाळी नाष्टामध्ये असे कोणते पदार्थ घ्यावे की ज्यामुळे वजनही कमी होईल व पोट देखील कमी होऊन तुम्ही एकदम फिट दिसाल.
सकाळच्या नाश्ता हा सर्वात महत्त्वाचा आहार समजला जातो. यामुळे तुम्हाला दिवसभर काम करण्यासाठी आवश्यक ऊर्जा मिळत असते. त्यामुळे सकाळी नाष्टा करताना त्याच्यामध्ये प्रथिन तसेच जीवनसत्त्व व इतर पोषक घटक भरपूर आहेत की नाही याची खात्री करून निवड करावी. या दृष्टिकोनातून या लेखात आपण असाच चार प्रकारच्या आरोग्यदायी नाष्ट्याची माहिती घेणार आहोत.
या प्रकारचा नाश्ता वजन कमी करण्याला ठरेल सहाय्यक
1- मूग डाळ डोसा– जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर सकाळी मुगडाळ डोसा खाणे खूप फायद्याचे ठरू शकते. सकाळी जर नाश्ता मध्ये तुम्ही मुगडाळ डोसा खाल्ला तर तुम्हाला दिवसभर कामासाठी आवश्यक असलेली ऊर्जा या माध्यमातून मिळते व लवकर भूक देखील लागत नाही. तसेच मुगडाळ डोसा तुम्ही प्रत्येक ऋतूमध्ये खाऊ शकतात.
2- ढोकळा– ढोकळा हा पदार्थ देखील सकाळच्या नाश्त्यासाठी खूप उत्तम पर्याय आहे. कारण ढोकळा हे वाफवलेले आणि आंबवलेले अन्नपदार्थ असल्यामुळे ते पचनक्रिया सुधारते आणि आतड्यांचे आरोग्य सुव्यवस्थित ठेवण्यासाठी मदत करते. तसेच चयापचय क्रिया वाढवते व त्यामुळे वजन कमी होते.
3- भाजलेली चणाडाळ– कडधान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रथिन आणि फायबर असतात. त्यामुळे कडधान्यांचे सेवन हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण आहे. यात जर तुम्ही सकाळी भाजलेले हरभरे खाल्ले तर आहारामधून फायबर आणि प्रथिने मिळायला मदत होते. कारण हरभऱ्यामध्ये भूक शमवण्याचा गुणधर्म असल्यामुळे वारंवार भूक लागत नाही व त्या अनुषंगाने वजन कमी होण्यास मदत होते.
4- भेळपुरी– भेळपुरी हा पदार्थ सगळ्यांचा आवडता असून बरेच जण भेळपुरी खातात. सायंकाळच्या नाष्टामध्ये भेळपुरी समाविष्ट केली तर याचा खूप मोठा फायदा मिळतो. कारण भेळपुरीमध्ये बऱ्याचदा कुरमुरे,
कोथिंबीर, चणाडाळ, शेंगदाणे आणि कांदा, टोमॅटो सारख्या पदार्थांचा समावेश केलेला असतो व यामध्ये अँटिऑक्सिडंट आढळून येते. एवढेच नाहीतर या पदार्थांमध्ये खनिजे आणि इतर पौष्टिक घटक देखील आढळतात. त्यामुळे सायंकाळचा नाश्ता किंवा दुपारच्या जेवणाआधी जर तुम्ही भेळपुरी खाल्ली तर ते फायद्याचे ठरते.