Volvo Electric SUV : युरोपियन ऑटोमोबाईल उत्पादक वॉल्वो या कंपनीने भारतीय बाजारपेठेत काही सर्वोत्तम इलेक्ट्रिक कार ऑफर केल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी आपल्या एका इलेक्ट्रिक SUV वर लाखो रुपयांची सूट देत आहे. कंपनीच्या या SUV मध्ये तुम्हाला कोणते फीचर्स अनुभवयाला मिळतात चला पाहूया…
कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, ग्राहक Volvo C40 रिचार्ज खरेदीवर मोठी सूट मिळवू शकतात. कंपनी या इलेक्ट्रिक एसयूव्हीवर 2 लाख रुपयांपर्यंत सूट ऑफर करत आहे. याआधी फेब्रुवारी महिन्यातही कंपनीने या वाहनावर 1 लाख रुपयांपर्यंत सूट दिली होती.

कंपनीची ही ऑफर फक्त SUV च्या 2023 मॉडेल्सवर दिली जात आहे. यासोबतच कंपनीने 2024 मध्ये तयार केलेल्या मॉडेल्सवर कोणत्याही प्रकारची सूट नसल्याची माहिती दिली आहे. ही सवलत ऑफर फक्त MY 2023 च्या उर्वरित युनिट्सवर दिली जात आहे.
Volvo C40 Recharge वैशिष्ट्ये
C-40 रिचार्ज इलेक्ट्रिक SUV 2022 मध्ये Volvo ने लॉन्च केली होती. यामध्ये, कंपनी नऊ-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, हरमन कार्डन ऑडिओ सिस्टम, ऍपल कार प्ले आणि वायर्ड अँड्रॉइड ऑटो, 12.3-इंच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, हीटेड सीट्स, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, पॅनोरमिक सनरूफ आणि ADAS सारख्या अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्ये प्रदान करत आहे.
बॅटरी
Volvo C40 Recharge मध्ये कंपनी 78kWh क्षमतेची बॅटरी देते. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही बॅटरी 530 किलोमीटर चालवता येते. यासोबतच यामध्ये ऑल व्हील ड्राइव्ह फीचरही देण्यात आले आहे. SUV मध्ये ट्विन मोटर देखील आहे, जी 403 bhp आणि 660 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. या SUV ला शून्य ते 100 किमीचा वेग गाठण्यासाठी फक्त 4.7 सेकंद लागतात. त्याचा टॉप स्पीड 180 किलोमीटर प्रति तास आहे आणि 150kWh चार्जरने फक्त 37 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज करता येतो.
किंमत
कंपनीकडून या एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 62.95 लाख रुपये आहे. पण त्याच्या MY23 मॉडेल्सवर 2 लाख रुपयांची सूट मिळत आहे. त्यानंतर ते 60.95 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीवर खरेदी केले जाऊ शकते.