नागवडे नेमके कुणाचे? थोरात की विखेंचे?

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :- एकेकाळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे व वडिलांनी त्यांची हयात काँग्रेसमध्ये घालवली अशा राजेंद्र नागवडे यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत हातमिळवणी केली.

त्यांचा हा निर्णय समर्थकांना रुचला नाही. त्यांचे वडील बापूंनी ज्याच्याविरोधात राजकारण केले, त्याच व्यक्तीचा विधानसभेत प्रचार केल्याने निष्ठावंतांनी त्यांना काहीसे दूर केले होते. तेव्हापासून संभ्रमात असलेले नागवडे हे पुन्हा सक्रिय झाले आहेत.

दरम्यान जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी अनुराधा नागवडे यांनी थोरात गटाला साथ दिली होती. त्यामुळे नागवडे नेमके कुणाचे, असा प्रश्न पडला आहे.

विधानसभा निवडणुकीला काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये जात आमदार बबनराव पाचपुते यांच्यासाठी मेहनत घेतलेले नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षासाठी अॅक्टिव्ह झाले आहेत.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक असणारे नागवडे मंगळवारी दिवसभर खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासोबत तालुका दौऱ्यात दिसले.

श्रीगोंद्यातील नागवडे कुटुंब काँग्रेस व थोरात हे समीकरण अनेक वर्ष नगर जिल्ह्याने अनुभवले आहे. दिवंगत ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे यांनी काँग्रेस आणि थोरात कुटुंब यांच्याशी कायम जिव्हाळ्याचे संबंध ठेवून श्रीगोंद्यासह नगर जिल्ह्याच्या राजकारणात वर्चस्व ठेवले.

त्यांच्या निधनानंतर श्रीगोंद्यातील काँग्रेसची सूत्रे त्यांचे पुत्र राजेंद्र नागवडे यांच्याकडे आली. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठा देत भाजपच्या बबनराव पाचपुते यांचा प्रचार केला होता.

मात्र हा निर्णय निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांना रुचला नव्हता. तरीही आता नागवडे हे भाजपात सक्रिय झाल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment