Tur Market Rate: सध्या तुरीला मिळत आहे 11 हजार रुपये प्रतिक्विंटलच्या पुढे दर! येणाऱ्या कालावधीत काय राहील दरांची स्थिती? शेतकऱ्यांनी तूर विकावी का थांबावे?

Ajay Patil
Published:

Tur Market Rate:- शेतमालाच्या बाजारपेठेतील मिळणाऱ्या दरांच्या दृष्टिकोनातून पाहिले तर बहुतांशी शेती पिकांचे दर यावर्षी घसरलेल्या स्थितीतच राहीलेले आहेत.शेतकऱ्यांसाठी मुख्य आर्थिक कणा असलेले सोयाबीन आणि कापसाने सुद्धा शेतकऱ्यांची बाजारभावाच्या बाबतीत निराशाच केली.

तसेच कांद्याच्या बाबतीत देखील आपल्याला म्हणता येईल. महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये कांद्याची लागवड होते व कांद्यावर निर्यात बंदी लादल्यामुळे प्रचंड प्रमाणात कांद्याचे दर घसरले आणि त्याचा मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला. परंतु या उलट मात्र तूर उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा यावर्षी दिलासा मिळताना दिसून येत आहे.

सध्या तुरीच्या बाजारभावात चांगल्या प्रकारे तेजी दिसून येत असून बऱ्याच बाजारांमध्ये सरासरी दर हे 11 हजाराच्या पुढे आहेत. म्हणजेच सरासरी दर पातळी पाहिली तर दहा हजार पाचशे ते अकरा हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहे व कमाल दर हा 12 हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंत आहे.

कारण यावर्षी तुरीची आवक कमी होत असून त्यामध्ये प्रत्येक दिवसाला घट होताना दिसून येत आहे.या सगळ्या पार्श्वभूमीवर डाळ मिल उद्योग तुरीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे त्रस्त असल्याचे चित्र आहे. यावर्षी उत्पादन कमी असल्यामुळे तुरीचा पुरवठा कमी होत आहे व त्यामुळे बाजाराला चांगला आधार मिळत आहे. परंतु पुढच्या दीड ते दोन महिन्यात तुरीच्या भावातील सुधारणा मर्यादित राहील असा एक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

 येणाऱ्या कालावधीत कशी राहील बाजारभावाची स्थिती?

जर आपण तुरीच्या स्टॉकच्या अनुषंगाने बघितले तर शेतकऱ्यांपैकी बरेच शेतकरी जूनमध्ये तुरीची विक्री करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे तुरीची आयात देखील सुरू आहे. तसेच देशातील बाजाराच्या दृष्टिकोनातून बघितले तर तुरीच्या कमी अधिक प्रमाणात सरकारच्या नियमात राहून स्टॉक केला जात आहे.

तसेच प्रक्रिया प्लांटची देखील खरेदी सुरू आहे. परंतु ती देखील गरजेप्रमाणेच आहे. तुरीच्या डाळीलाही मागणी आहे. परंतु उत्पादन कमी असल्याने पुरवठा कमी आहे. याच गोष्टीमुळे तुर बाजाराला चांगला आधार मिळत आहे.

 शेतकऱ्यांनी तूर विकावी का थांबावे? काय म्हणतात बाजार अभ्यासक?

सध्या तुरीला दहा हजार पाचशे ते अकरा हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे व जास्तीत जास्त भाव 12 हजाराच्या आसपास आहे. सध्या जो काही तुरीला दर मिळत आहे त्यामध्ये पाचशे रुपयेपर्यंत चढ उतार राहू शकते असा देखील एक अंदाज आहे.

त्यामुळे जे शेतकरी या कालावधीमध्ये तूर विकण्याचे नियोजन करण्याचा विचार करत आहात त्यांनी बारा हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान तूर विक्रीचा विचार करू शकतात असे देखील या क्षेत्रातील अभ्यासकांनी सांगितले. तसेच यावर्षी चांगला पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे व असे झाले तर तुरीची लागवड देखील वाढेल असा एक अंदाज व्यक्त केला जात आहे.

अजून महिन्यामध्ये जर चांगला पाऊसाला सुरुवात झाली व लागवड खरच वाढली तर याचा काहीसा परिणाम बाजारावर दिसू शकतो व यामुळे बाजारातील सुधारणा काही कालावधीकरिता थांबू शकते असे देखील तुर बाजारातील तज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे.

 तुरीची आयात देखील आहे महाग

तुरीचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकारच्या माध्यमातून तूर आयात केली जात आहे. परंतु आयात केलेले तुरीचे दर देखील जास्त असल्याने ती तूर देखील महाग मिळत आहे. आयात तुरीचा सरासरी दर देखील 9000 ते 10 हजार रुपयांच्या आसपास आहेत.

त्यामुळे पुढील हंगामातील तूर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुरीचे भाव तेजीतच राहतील असा एक अंदाज अभ्यासाकांनी व्यक्त केला आहे. असे सणासुदीच्या कालावधीमध्ये तुरीचे भाव आणखीन वाढू शकतात. दरात काहीसे चढ-उतार देखील दिसतील असा देखील अंदाज अभ्यासाकांनी वर्तवला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe