‘ती’ कोरोना पॉझिटिव्ह भाजीविक्रेती ! नागरिकांमध्ये मोठी खळबळ

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 : शिर्डी लगतच असणाऱ्या निमगाव येथे पन्नास वर्षे भाजी विक्री करणा्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शिर्डी व परिसरात नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

शिर्डी व परिसर आत्तापर्यंत कोरोना मुक्त होता. मात्र निमगाव येथील महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे समजताच राहाता तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

प्रशासन व कोरोणा वारियर्स युद्धपातळीवर कार्यरत झाले आहे. राहाता तालुक्यातील व शिर्डी नजीक असणाऱ्या निमगाव कोऱ्हाळे येथील ही महिला भाजीविक्रीचे काम करते.

निमगाव व सावळीविहिर आदी परिसरात ही महिला भाजी विक्री चे काम करत होती. तिला खोकला सर्दीअशी कोरोनासारखी लक्षणे आढळली, मात्र ती शिर्डी येथे साईबाबा संस्थानच्या हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी गेली होती.

तीन दिवस या हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार करण्यात आले होते. यावेळी हॉस्पिटलमधील दहा ते अकरा आरोग्य कर्मचारी तिच्या संपर्कात आले असल्याचे समजते.

तसेच तिच्या घरातील सात ते आठ,व्यक्ती तिच्या संपर्कात आल्याचे बोलले जात आहे. त्याचप्रमाणे काही नातेवाईक व भाजी घेणारे ग्राहक या महिलेच्या संपर्कात आल्याचे माहिती मिळत आहे. काहीना तपासणीसाठी नगरला पाठवण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment