Ahmednagar News : पराभवाच्या भीतीने विरोधकांकडून काही दिवसांपासून रडीचा डाव खेळला जात असल्याचे दिसून येत आहे. पराभव डोळ्यासमोर दिसून येत असल्याने चुकीच्या पद्धतीने प्रचार करत असल्याचे दिसून येत आहेत.
मुद्दामून रॅलीत आपलेच कार्यकर्ते घुसवून राडा करण्याचा हा त्यांचा नवीन प्रकार नाही. त्यामुळे त्यांच्या या रडीच्या डावाला नगरचे जनता भुलणार नसून जिल्हा दहशत तसेच भयमुक्त केल्याशिवाय राहणार नाही.

Ahmednagar News
काल रात्री शहरातील घडलेल्या घटनेबाबत महाविकास आघाडीचे पदाधिकारी संभाजी कदम व अभिषेक कळमकर यांनी खुलासा केला असून सदर घडलेल्या
घटनेवर घटनेत प्रशासनाने निःपक्ष भूमिका घेऊन तपास करून संबंधित आरोपींवर कारवाई करावी. अशी भूमिका संभाजी कदम यांनी मांडली आहे.