Ahmednagar News : कोपर्डीच्या यात्रेत तमाशा चालू असताना समोर नाचल्यामुळे मागासवर्गीय तरुणाला जातीवाचक शिविगाळ करुन नंतर नग्न करत मारहाण केली. या प्रकारामुळे तरुणाने आत्महत्या केल्याने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
यात कोपर्डी घटनेतील पिडीत निर्भयाच्या भावासह तिघा विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी जोपर्यंत ताब्यात घेतले जात नाहीत तो पर्यंत मयताचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय नातेवाईक व कार्यकर्ता यांनी जाहीर करत कर्जत पोलिस स्टेशन मध्येच ठिव्या दिला.
शुक्रवारी दुपारी ५ चे सुमारास तिन्ही आरोपीना ताब्यात घेतली असल्याची माहिती अप्पर ‘पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिली. तर गुरुवारी संध्याकाळी ताब्यात घेतलेल्या दोन आरोपीना न्यायालयात हजर केले असता त्यांना आठ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कोपर्डी येथील विठ्ठल ऊर्फ नितीन कांतीलाल शिंदे (वय ३७, रा. हरणवस्ती, कोपर्डी) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मयताचे वडील कांतीलाल गोपाळ शिंदे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की ९ मे रोजी कोपर्डी गावात भैरवनाथाची यात्रा होती.
यात्रेसाठी गावात आलेल्या तमाशात भांडणे झाली व त्यावेळी दिनेश ऊर्फ बंटी बाबासाहेब सुद्रिक, स्वप्निल बबन सुद्रीक, वैभव मधुकर सुद्रीक या तिघांनी आपल्या मुलाला नाचण्याच्या कारणावरुन मारहाण केल्याचे आपणाला गुरुवारी दि २ मे रोजी गावात समजले. त्यानंतर आपण जवळच राहत असलेल्या आपल्या मुलाच्या घरी चौकशीसाठी गेलो असता तो रात्रीपासून घरी आला नसल्याचे त्याच्या पत्रीने सांगितले.
थोड्यावेळाने आपला लहान मुलगा शांतीलाल याचा फोन आला व विठ्ठल हा स्मशानभूमीत नग्न अवस्थेत असल्याचे त्याने सांगितले, घरुन कपडे पाठवून त्याला घरी आणले असता तमाशात नाचलो म्हणून आपणास वरील तिघांनी जातीवाचक शिविगाळ करुन मारहाण केली. नंतर घरी येत असताना मारहाण करत स्मशानभूमीत नेऊन नग्ण केले. आपणाकडील कपडे, मोबाईल सगळे काढून नेले. त्यामुळे मला घरी येता आले नाही.
या अपमानामुळे आपली जगण्याची इच्छा राहिली नाही, अशी हकिगत नितीनने आपणाला सांगितली. त्यावेळी आपण व जावयाने त्याची समजूत काढली. त्यानंतर गुरुवारी दुपारी विठ्ठल हा बाबूलाल गोपाळ शिंदे यांच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्याच्या खिशात ‘माझे जीवन संपवत असून या बाबीला बंटी बाबासाहेब सुद्रीक व स्वप्निल बबन सुद्रीक कारणीभूत आहेत, असे म्हटले आहे. ही सर्व हकीगत कांतीलाल यांनी फिर्यादीत नमूद केली आहे.
पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी समोर आलेल्या या प्रकारानंतर कर्जत पोलीस स्टेशन समोर दलीत कार्यकर्तानी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी कोपर्डीत व कर्जतमध्ये बंदोबस्त वाढविला होता. पोलिसांनी परिस्थीतीचे गांभीर्य ओळखून दोन आरोपींना तातडीने अटक करण्यात यश मिळवले होते मात्र एक आरोपी स्वप्निल बबन सुद्रीक हा फरार झाला होता. नातेवाईक व कार्यकर्ते यांनी जो पर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही तो पर्यंत मयताचे शवविच्छेदन ही करण्यात येऊ नये वते शव आम्ही ताब्यात ही घेणार नाहीत असे म्हणत कर्जत पोलिस स्टेशन मध्येच अनेकांनी ठाण मांडले होते.
या प्रकरणी अप्पर ‘पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उप विभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे, पोलिस निरीक्षक मारुती मूळूक व पोलिस विभागाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सर्वांना शांत करत तपासाची सूत्रे गतीने हलवली यासाठी चार पथके तयार केली होती. या तिन्ही आरोपी विरुद्ध अॅक्टरोसिटी सह विविध कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपर्डी हत्याकांडातील पीडित निर्भयाच्या भावाचा या आरोपीत समावेश असून त्याचे कडे कमरेला पिस्तूल असते व त्याने आमच्या अजून कोणाला मारले तर असा प्रश्न उपस्थित करत त्यास अटक करण्याची मागणी करण्यात येत होती अखेरीस पुपारी त्यास अटक केल्याची माहिती मिळाल्यानंतर काहीसा सुटकेचा निःश्वास सर्वांनीच सोडला मात्र उशिरा पर्यंत मयताचे नातेवाईक तोच आरोपी पकडला आहे का हे पाहण्यासाठी बसून होते.
शुक्रवारी तिसरा आरोपी अटकेसाठी मयताच्या नातेवाईकांचा ठिय्या
सदरच्या घटनेत कर्जत पोलिसांनी बंटी सुद्रीक आणि वैभव सुद्रीक या दोन आरोपीना गुरुवारी संध्याकाळी ताब्यात घेण्यात यश मिळवले होते. तर तिसरा आरोपी स्वप्नील सुद्रीक हा फरार होता.
त्याच्या अटकेसाठी मयत विठ्ठल शिंदेच्या कुटुंबियासह नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या दिला होता. शुक्रवारी पाच वाजता अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने तिसरा ही आरोपी ताब्यात घेतला असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरेनी जमावास दिली.
मात्र त्यास प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय आम्ही हलणार नाहीत अशी भूमिका या सर्वांनी घेतली.