Vani Merchant Bank Bharti : नाशिक मधील वाणी मर्चंट बँकेत ‘या’ रिक्त पदांसाठी निघाली भरती, या तारखेपर्यंत करा अर्ज!

Vani Merchant Bank Bharti 2024

Vani Merchant Bank Bharti 2024 : जर तुम्ही नाशिक जिल्ह्यात राहत असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या वाणी मर्चंट बँक अंतर्गत विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.

वरील भरती अंतर्गत “वरिष्ठ अधिकारी, अधिकारी, ई.डी.पी. बी. ई. अधिकारी, लिपीक” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन(ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे. उमेदवारांनी लक्षात घ्या अर्ज देय तारखे अगोदर सादर करायचे आहेत, नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

शैक्षणिक पात्रता

या जागांसाठी पदवीधर आणि पद्युत्तर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

नोकरी ठिकाण

ही भरती नाशिक या ठिकाणी सुरु आहे.

अर्ज पद्धती

यासाठी अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज दि वणी मर्चन्टस् को-ऑप. बँक लि., वणी परीस, शिवाजी रोड, वणी, ता. दिंडोरी, जि. नाशिक. येथे पोस्टाने पाठवायचे आहेत.

ई-मेल पत्ता

ऑनलाईन अर्ज vmc_bank@rediffmail.com / vmc_bank@vmcbank.co.in या ईमेलद्वारे सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे. देय तारखे नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचा आहे.

-अर्ज वर दिलेल्या पद्धतीने सादर करायचा आहे.

-यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 असून, उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत.

-अर्ज पाठवण्यापूर्वी उमेदवारांनी एकदा भरती जाहिरात सविस्तर वाचावी.