NRCG Pune Bharti 2024 : ICAR-NRCG पुणे येथे पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी, वाचा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NRCG Pune Bharti 2024 : ICAR – नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स, पुणे येथे सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

वरील भरती अंतर्गत “SRF, YP (ll) “ पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन सादर करण्याची शेवटची तारीख 09 मे 2024 आहे. तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.

नोकरी ठिकाण

ही भरती पुणे येथे सुरु आहे.

वयोमर्यादा

यासाठी वयोमर्यादा 21 ते 45 वर्षे इतकी आहे.

अर्ज पद्धती

अर्ज ऑफलाइन पोस्ट द्वारे संबंधित पत्त्यावर पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याचा पत्ता

अर्ज संचालक, ICAR- नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स, पी.बी. क्र.-3, मांजरी फार्म पोस्ट, सोलापूर रोड, पुणे- 412307, महाराष्ट्र. या पत्त्यावर पाठवायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास nrcgrapes.icar.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

-अर्ज 09 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत. देय तारखे नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

-अर्ज हा पूर्ण भरलेला असावा अपूर्ण अर्ज किंवा समर्थित नसलेली आवश्यक कागदपत्रे नाकारली जातील.

-भरती संबंधित सविस्तर जाहिरात अटी, शर्ती तथा अर्जासह nrcgrapes.icar.gov.in वर उपलब्ध आहे.

-भरती जाहिरात पाहण्यासाठी यावर क्लिक करा.