नवविवाहितेचा मृतदेह विहिरीत आढळला

Published on -

राहुरी :- तालुक्यातील उंबरे येथील नवविवाहितेचा मृतदेह वांबोरी शिवारातील गडाखवस्ती येथील विहिरीतील पाण्यावर तरंगताना आढळला. योगिता ऋषिकेश ढोकणे असे तिचे नाव आहे.

चारित्र्याचा संशय घेऊन पती व सासूने शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबतची तक्रार विवाहितेचे वडील रघुनाथ केशव दरेकर (ताहराबाद, ता. राहुरी) यांनी वांबोरी दूरक्षेत्रात दिली आहे.

सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास उंबरे येथील राहत्या घरातून बेपत्ता झालेली योगिता ही सोमवारी सायंकाळपर्यंत उंबरे-वांबोरी रस्त्यावर असलेल्या गडाखवस्ती परिसरातील झाडाच्या सावलीत बसली होती.

ही महिला कोणाची वाट पाहत असावी असे वाटल्याने तिच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. योगिताला बेपत्ता होऊन चोवीस तास उलटले, तरीही ती घरी न आल्याने तिचा सर्वत्र शोध सुरू झाला.

मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास सचिन अनिल गडाख हे आपल्या शेतातील घासाला पाणी देण्यासाठी विहिरीवर गेले असता त्यांना महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला.

पोलिसांशी संपर्क साधून त्यांनी ही माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेहवर काढून ग्रामीण रुग्णालयात पाठवला.

वर्षभरापूर्वी ९ मे २०१८ रोजी योगीताचा उंबरे येथील ऋषिकेश ढोकणे याच्याशी मोठ्या थाटामाटात विवाह झाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News